वार्ड क्रमांक ४ मध्ये दीड वर्षांत अंदाजे ५० लाख रुपयांची विकासकामे पूर्ण. – मयुर पटारे

वार्ड क्रमांक ४ मध्ये दीड वर्षांत अंदाजे ५० लाख रुपयांची विकासकामे पूर्ण. – मयुर पटारे
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतचे वतीने पंधरावा वित्त आयोग निधीतून वार्ड क्रमांक ४ मधील मगर वस्तीसाठी भूमिगत गटारचे अधिकृत भूमिपूजन मान.सरपंच सौ.अर्चनाताई रणनवरे यांच्या अध्यक्षतेखाली, जेष्ठ.श्री.दत्तात्रय मगर,सरपंच श्री.भाऊसाहेब मगर, मा.श्री. दिनकर मगर युवा नेते .विकास मगर, सचिन मगर,.सुधीर मगर, शैलेश मगर,.ऋषभ मगर, अमित सटाले,.विपुल मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोकसेवा विकास आघाडीचे जेष्ठ मार्गदर्शक लहानभाऊ(दादा) नाईक, जेष्ठ नेते भाऊमामा थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर भूमिगत गटार करताना मगर वस्तीतील व परिसरातील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊनच आणि त्यांच्या सोयीने हे काम पूर्ण करण्यात येईल. वार्ड क्रमांक ४ मध्ये विकासकामांची घोडदौड सुरू असून आत्तापर्यंत अंदाजे ५० लाख रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून त्यामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते, पेव्हींग ब्लॉक, नवीन रोहित्र, भूमिगत गटार, दिवा बत्ती, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन इत्यादी कामांचा समावेश असून लवकरच महादेव मंदिर परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, जेष्ठ नेते .दत्तात्रय नाईक, .शंकर. पवार, रिपाईचे जेष्ठ नेतेसंजय रणनवरे, उपाध्यक्ष मा.श्री.रावसाहेबनाना वाघुले, संचालक यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्या. लताबाई पटारे, ग्रामपंचायत सदस्या.अर्चनाताई पवार, सुनील बोडखे, शिवाजी पवार, भाऊसाहेब पटारे, .शिवातात्या पटारे, रमेश पटारे, सुभाष जगताप, प्रकाश नाईक, संभाजीराजे येवले, अशोक वेताळ, संजूतात्या पटारे, मछ्चिंद्र कोकणे, भागवत रणनवरे, अनिल कुदळ, .सुभाष मांजरे, तान्हाजीराव मांजरे उपस्थित होते.