*श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चे प्रमुख विस्वस्थ म्हणून दुसऱ्यांदा श्री योगेश देसाई यांची निवड*

*श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चे प्रमुख विस्वस्थ म्हणून दुसऱ्यांदा श्री योगेश देसाई यांची निवड*
*संस्थान कमिटी व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली माहिती*
पुणे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी च्या ऑफिस वर माहे ऑगस्ट २०२२ ची सर्ब विस्वस्तांची मासिक सभा घेण्यात आली, यासभेत सर्वानुमते ठराव घेत श्री योगेश देसाई यांचे नाव सन २०२२-२०२३ साठी प्रमुख विस्वस्थ म्हणूण घोषित करण्यात आले आहे, आषाढी वारी नंतर प्रमुख विश्वस्थ हे बदलले जात असतात , यात श्री योगेश देसाई हे दुसऱ्यांदा प्रमुख विश्वस्त म्हणून नेमले जात आहेत, सन२०२१-२०२२ साठी हि श्री योगेश देसाई यांनी प्रमूख विश्वस्त म्हणुन काम पाहिले आहे, पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी तसेच देसाई बंधू आंबेवाले अशी त्यांची व्यापार क्षेत्रात ओळख कायम आहे.
प्रमुख विश्वस्त संस्थान कमिटी आळंदी बाबत निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर आळंदी यांनी प्रसिद्धीस दिली, यावेळी अर्थ तज्ञ विस्वस्थ डॉ अभय टिळक, श्री लक्ष्मीकांत देशमुख, ॲड विकास ढगे, उपस्थीत असल्याची माहिती दिली आहे,