पिंप्री कोलंदर येथे लहुजी शक्ती सेना शाखेचे उदघाटन

*पिंप्री कोलंदर येथे लहुजी शक्ती सेना शाखेचे उदघाटन*
– श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर सकटवस्ती या ठिकाणी.शुक्रवार दि.५/८/२२रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२व्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी शक्ती सेना संघटना शाखेचे नामफलकाचे अनावरण व नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कार करण्यात आला. पावसामुळे कार्यक्रमाला उशीर झाला होता.तरीही रात्री दहा वाजता प्रथमतः अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुजा करून शाखेचे फलक अनावरण करण्यात आले.अनेक मान्यवरांची भाषणे झाली न्याय हक्कांसाठी,अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी लहुजी शक्ती सेना अहोरात्र काम करते आहे.लहुजी शक्ती सेना हि जहाल आक्रमक व अन्याया विरुध्द लढा देणारी संघटना आहे..आणि आपण या शाखेच्या माध्यमातून लहुजी शक्ती सेनेचे एक भाग झाला आहात,आता रडायचं नाही तर लढायचं असं श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथभाऊ शिंदे यांनी आपल्याभाषणात म्हटले तर आपल्याला अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा असेल तर आधी आण्णाभाऊंचे विपूल साहित्य वाचा संघटन वाढीसाठी सर्वांनी हेवेदावे सोडून एकत्र आलो तरच समाजाचा उत्कर्ष होईल असे प्रतिपादन जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम आप्पा रोकडे यांनी मांडले आणि नुसता देव्हारा मोठा करण्यापेक्षा मुलांचे पुस्तकांचे कपाट मोठे करा असे मोलाचे विचार बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष बापूराव गायकवाड यांनी मांडले.प्रत्येक व्यक्ती हा लहु सैनिक आणि प्रत्येक गाव तेथे शाखा बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असे श्रीगोंदा शहराध्यक्ष प्रफुल्लभाऊ आढागळे यांनी आपल्या भाषणातून म्हटले. खादी ग्रामोद्योगचे विद्यमान चेअरमन ससाणे सर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी गावातील फलक अनावरण तसेच सर्व नवनियुक्त शाखा पदाधिकारींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम आप्पा रोकडे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथभाऊ शिंदे, श्रीगोंदा शहराध्यक्ष प्रफुलभाऊ आढागळे, नेते वसंतभाऊ अवचिते,श्रीगोंदा तालुका महिलाआघाडीच्या अध्यक्षा पुष्पाताई शेंडगे, उपाध्यक्षा कामिनीताई सकट, सामाजिक कार्यकर्ते प्रविणकुमार शेंडगे,सागर गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष बापूराव गायकवाड, व खादी ग्रामोद्योगचे विद्यमान चेअरमन ससाने सर
उपस्थित होते. पिंप्री गावचे शाखाध्यक्ष म्हणून कृष्णा शेलार,तर उपाध्यक्षपदी दादाभाऊ सकट यांची निवड करण्यात आली त्यावेळी संजय सकट,राजाराम सकट, संदिप सकट, संकेत सकट,ज्ञानदेव सकट,मधुकर सकट,अनिल सकट, तुकाराम सकट, सुरेश ससाणे, भानुदास सकट,सुदाम सकट,कालीदास आढागळे, विजयकुमार सकट, समाधान सकट,प्रविण सकट,किरण शेलार ,नामदेव सकट,
पोपट सकट, तसेच महिलावर्ग ही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.यावेळीमहिला आघाडी शाखाध्यक्षपदी सुरेखा मदन सकट,उपशाखाध्यक्ष वैशाली शेलार, सचिव रुपाली दादाभाऊ सकट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी पाहून उपस्थित ही भारावून गेले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ससाणे सर हे होते आणि सूत्रसंचालन वसंतभाऊ अवचिते यांनी केले तर आभार मोहनराव सकट यांनी मानले.