जलशक्ती अभियनाच्या सदस्यपदी संदिप दरंदले पाटील.

जलशक्ती अभियनाच्या सदस्यपदी संदिप दरंदले पाटील.
सोनई-प्रतिनिधी-देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शानाखालील केंद्र सरकार पुरस्कृत जलशक्ती अभियानाच्या सदस्यपदी सत्यमेव जयते हेल्थ फाॅडेंशनचे अध्यक्ष संदिप दरंदले पाटील यांची एनजीओ गटातुन निवड झाली आहे.जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले हे जलशक्ती अभियानाचे अध्यक्ष असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली.
नुकताच नवी दिल्ली येथील केंद्रीय गृहमंञालयाचे उपसचिव राहुल मलिक व तंञज्ञान अधिकारी डाॅ.एस.आर स्वामी या दोन जणांच्या पथकाने अहमदनगर जिल्हाचा दौरा केला.यादरम्यान जिल्हातील विविध भागात फिरून शाश्वत जलस्ञोताचा अभ्यास करून आढावा घेतला.तसेच केंद्रीय जलशक्ती अभियान पुरस्कृत ‘कॅच द रेन’ या उपक्रमा अंतर्गत जिल्हात विविध विभागांनी तयार केलेल्या कामाचा लेखाजोखा घेण्यासाठी जिल्हास्तरीय जलशक्ती अभियानाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा जलसंधारण आस्थापनाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.बैठकित जलशक्ती अभियाना अंतर्गत “कॅच द रेन” म्हणजे पावसाचे पाणी अडविणे व साठवणे यासाठी रेन वाॅटर हाॅर्वेस्टिग यंञणा आपल्या घराच्या व ऑफिसच्या छतावर बसवणे.यासाठी अहमदनगर जिल्हात मोठे काम उभारणार असल्याचे जलशक्ती अभियानाचे सदस्य संदिप दरंदले पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.तसेच नदी नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी उपाययोजना व पाठपुरावा करणार असुन जलशक्ती अभियान ही जलसाक्षरतेची लोकचळवळ बनवणार आहे.यासाठी शाळा,काॅलेज व शासनासह लोकसहभाग महत्वाचा असुन जिल्हाचे भूषण पदमभुषण डाॅ.आण्णासाहेब हजारे व हिवरेबाजारचे सरपंच पज्ञश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात जलशक्ती अभियाना अंतर्गत कॅच द रेन उपक्रमात मोठे काम उभारणार असल्याचे जलशक्ती अभियानाचे सदस्य संदिप दरंदले पाटील यांनी केंद्रीय गृहमंञालयाचे उपसचिव राहुल मलिक व डाॅ.एस.आर स्वामी यांना सांगितले.यावेळी विविध विभागाचे अधिकारी तीन दिवसीय चर्चासञात सहभागी झाले होते.या निवडीबद्दल त्यांचे जिल्हाभरातील मान्यवराकडुन अभिनंदन होत आहे.