सांस्कृतिक सभागृहाचे शाळेला लोकार्पण*

*सांस्कृतिक सभागृहाचे शाळेला लोकार्पण*
*लोकसहभाग व CSR मधून दर्जेदार शिक्षण संकुलाची उभारणी – श्री मधुसूदन राठी यांचे गौरवोदगार …*
कै. श्रीमती लिलाबाई राठी यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उद्योजक श्री वसंत राठी व श्री विजय राठी यांनी 12 लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद आदर्श शाळा धानोरे ता खेड पुणे.या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बांधून दिलेल्या सांस्कृतिक सभागृहाचा हस्तांतरण समारंभ आज पार पडला. या प्रसंगी झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक श्री राम गावडे यांनी ग्रामस्थांचे वतीने मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब व परिसरातील उद्योजक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्या मुळेच धानोरे ची शाळा आदर्श झाली असल्याचा उल्लेख केला व देणगीदारांचे ग्रामस्थांचे वतीने आभार मानले. श्री मधुसूदन राठी डायरेकटर पॉलिबोण्ड इंडिया लि, रोटरीयन रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल अध्यक्ष मधुसूदन राठी चॅरिटी ट्रस्ट यांचा ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांचे वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर उद्योजक श्री वसंत राठी व श्री विजय राठी यांचा ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी उद्योजक श्री सुरेशनाना झोम्बाडे,पोलिबॉण्ड इंडियाचे मॅनेजर श्री महेंद्र फणसे सर धानोरे गावचे उपसरपंच श्री विठ्ठल गावडे ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष गावडे. श्री नरहरी गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मंगेश गावडे, उपाध्यक्षा सौ पल्लवी गावडे तसेच अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी धानोरे शाळेच्या मोबाईल ॲपचे व शाळेच्या वेबसाईटचे उदघाटन श्री मधुसूदन राठी यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक आदर्श मुख्याध्यापक श्री सत्यवान लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीम. अनिता परदेशी तर आभार श्रीम मोहंमदी काझी यांनी मानले.