मतमाऊलीचा यात्रोत्सव धार्मिक स्थळापासून५०० मीटर अंतरा भरविण्यात यावी – ग्रामस्थांची मागणी.

मतमाऊलीचा यात्रोत्सव धार्मिक स्थळापासून५०० मीटर अंतरा भरविण्यात यावी – ग्रामस्थांची मागणी.
टाकळीभान (प्रतिनिधी) येथील मतमाऊलीची यात्रा धार्मिक• स्थळापासून ५०० मीटर अंतरावर भरविण्यातयावी, यात्रोत्सव शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी असल्याने प्रशासनाने योग्य ती व्यवस्था लावावी, अशीमागणी रवींद्र वाहुळ यांनी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये प्रसिध्द असलेली मतमाऊलीची यात्रा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडते. या यात्रेसाठी देशाच्या प्रत्येक भागातून सुमारे चार ते पाचलाख भाविक दर्शनासाठी येत असतात.सदर जागेमध्ये भाविकांचा मोबाईल,महिलांचे दागिणे, पर्स, मौल्यवान वस्तूंचीचोरीचे प्रकार घडले. तसेच मद्यविक्री विविध जुगार, सोरट आदी अवैध धंदे राहट पाळण्याशेजारी जोमात सुरु असतात.तर काही गुंडगिरी प्रवृत्तीचे तरुण यात्रेमध्ये धुडगूस घालतात. त्यांचा भाविकांवर मोठा परिणाम होतो. चर्चच्या मुख्य दरवाजापासून दुकान व्यवस्था असते.
हरेगाव येथील सर्व जागा ही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून त्याठिकाणी बेलापूर कंपनीचे हस्तक्षेप करण्याचे काही कारण नाही. हरेगाव राहट पाळणे गट नं ३ मधील कुलीलाईन येथे लावले जातात. त्या जागेबाबत सर्व अधिकार तहसीलदार यांचे असून त्यामुळे तहसीलदार यांनी स्वतः उपस्थित राहून राहट पाळण्यासाठी बोली अथवा लिलाव पध्दत अवलंबावी, अशी मागणी ग्रास्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
या जागेत यात्रेचे हे ७५ वे वर्ष पूर्ण झाले असल्याने यावर्षी अमृत महोत्सव म्हणून भाविकांची गर्दी नेहमीपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे दर्शनस्थळापासून दुकान व राहट पाळणे व्यवस्था ५०० मिटर अंतरावर करावी, अशी मागणी करुन दर्शनस्थळ ते हरेगाव- उंदिरगाव मुख्य रस्त्यामधील जागेवर पोलीस अग्निशामन दल, आरोग्य विभागाची व्यवस्था योग्य त्या ठिकाणी करण्यात यावी, तहसीलदार यांनी पाहणी करून दुकानदारांना जागा मोजणी करून द्यावी, यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये,अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर सूर्यकांत चाबुकस्वार,मिलिंद बोधक, प्रदीप गायकवाड, विशाल रामगुडे, दिनेश चित्ते, पंकज खरात, युवराज पवार, हकिम हसने, सुनील नरवडे, अनिल वाघमारे, रोहन डुकरे, गणेश खरात, विशाल फुलारे आदींसह १०६ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.