नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या दूषित पाण्यामुळे गावामध्ये विविध आजारांमध्ये लक्षणीय वाढलेले दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली…

टाकळीभान येथे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या दूषित पाण्यामुळे गावामध्ये विविध आजारांमध्ये लक्षणीय वाढलेले दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली…
टाकळीभान येथे यावर्षी पावसास जोरदार सुरुवात झाल्याने, तसेच नेहमीच्या रिमझिम पावसाने, ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून, डासांचा प्रादुर्भाव गावामध्ये वाढला आहे, तसेच होणाऱ्या पावसामुळे गटारी तुंबल्या असून, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या काही लाईन लिक झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे, तसेच ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये नव्या पाण्याची आवक झाल्याने त्या पाण्यामध्ये दूषितपणा असून जंतू युक्त पाण्यात वाढ झाली आहे, याबाबत नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा मिळत नसल्याने जुलाब, थंडी ताप ,पोटदुखी , सर्दी, घसा, खोकला व विविध साथीच्या आजारांना कुटुंब व कुटुंबातील सर्वच वयातील व्यक्तींना सामोरे जावे लागत आहे. यावर आरोग्य केंद्राने वेळोवेळी ग्रामपंचायतचे गावास पुरवठा करणारे पाण्याचे नमुने चेक करावे, त्याचप्रमाणे गावांमध्ये आशा सेविका यांनी फिरून जनजागृती करून नागरिकांना स्वच्छ पाणी करणारे मेडिक्लोर वाटणे, पाणी गरम करून पिण्यास सांगणे आदी सूचना कराव्यात. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्र या ठिकाणी गवत व घाणीचे साम्राज्य वाढून डास वाढले आहेत, त्या ठिकाणी डास फवारणी करावी तसेच गावामध्ये ही डास फवारणी करावी त्यामुळे होणाऱ्या विविध आजारांना आळा बसेल परंतु सध्या तरी नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व इतर योग्य सोयी सुविधा न मिळाल्याने विविध आजारांना बळी पडलेल्या नागरिकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे, तरी आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतने नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत जागरूक राहून उपाययोजना कराव्यात अशी मागणी जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.