पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा आरोप संजय राउत यांच्यावर करण्यात आले.

*पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा आरोप संजय राउत यांच्यावर करण्यात आले.
राजकारणातील सर्वात मोठी बातमी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय विभाग ईडीने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊंतांवर करण्यात आला होता. राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे.
संजय राउत यांच्यावर कारवाई केल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, पत्राचाळ व्यवहारात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला आहे. राऊतांची रवानगी आता तुरुंगात नवाब मलिक यांच्या बाजूच्या खोलीत व्हावी. तसेच संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यावर महिला शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्या असून राऊतांच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे. राउत यांच्या घरासमोर शिवसैनिक घोषणा देत आहेत. संपूर्ण शिवसेना संजय राउत यांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राउत यांनी दिली आहे