विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा टँकरखाली चिरडून मृत्यू

विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा टँकरखाली चिरडून मृत्यू
बेलापुर (प्रतिनिधी )-दोन मोटारसायकल व एक टँकरच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला आहे मयत हे नायगाव नाऊर येथील असुन नायगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले या बाबत मिळालेली माहीती अशी की नायगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड वय ४५वर्ष त्यांचा मुलगा अजीत बाळासाहेब गायकवाड वय २० वर्ष त्यांची मुलगी वय वर्ष १८ हे तिघे एम एच १७ ७१३१या बजाज सीटी १०० या मोटार सायकलवर बेलापुरकडे चालले होते .ते गायकवाड वस्ती नजीक असताना श्रीरामपुर कडे जाणाऱ्या एका मोटारसायकलचा डँश त्यांना लागला तसे ते तीघेही रस्त्यावर पडले अन दुर्दैवाने श्रीरामपुर हुन बेलापुरकडे मळीचा टँकर एमएच ४३यू ३३३६ हा भरधाव वेगाने चालला होता मोटारसायकलचा डँश लागल्यामुळे हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले अन एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे भरधाव टँकरने तिघांनाही चिरडले दिपाली बाळासाहेब गायकवाड हीचा जागेवरच मृत्यू झाला तर बाळासाहेब गायकवाड यांच्या पोटावरुन टँकरचे चाक गेले होते त्यांना साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले होते परंतु उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अजित गायकवाड अत्यवस्थ असताना पुढील उपचारासाठी नगरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला घटना घडली त्याच वेळेस बेलापुरचे पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे तेथुन चालले होते त्यांनी तातडीने जखमींना दवाखान्यात हलविले या वेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती ती गर्दी हटविताना पोलीसांना मोठी कसरत करावी लागली अनेकानी अपघातात मदत करण्याऐवजी मोबाईल मध्ये फोटो काढण्यात धन्यता मानली घटनेची माहीती नायगाव नाऊर परिसरात समजताच नायगाव परिसरावर शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात तिघावरही अंत्यसंस्कार करण्यात आले या बाबत पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला असुन एका मोटारसायकलचा पोलीस शोध घेत आहे