हे सरकार बेकायदेशीर आहे, लवकर मध्यवर्ती निवडणुका होईल, गदराना

हे सरकार बेकायदेशीर आहे, लवकर मध्यवर्ती निवडणुका होईल, गदराना
त्यांची जागा जनता दाखवून देईल, जनता आमच्या पाठीशी असून, हेच आमचे दैवत असून खरी शिवसेना आहे असे प्रतिपादन टाकळीभान येथे शिवसंवाद यात्रे दौऱ्यानिमित्त आदित्यजी ठाकरे यांनी वक्तव्य केले.
टाकळीभान येथे शिवसंवादयात्रा दौऱ्यानिमित्त युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे टाकळीभान नगरीमध्ये भव्य दिव्य अतिषबाजी मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी ने परिसर दुमदुमून गेला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील व तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते व शिवसैनिक आदित्यची ठाकरे यांना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी उत्सुक होते. यावेळी मा. श्री आदित्यजी ठाकरे यांचा गुलाब पुष्पहार घालून शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की जनतेशी संवाद साधत त्यांचे प्रेम व आशीर्वाद यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू आहे. यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल छेडले असता त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून, उद्धव साहेबांच्या कठीण काळात साथ सोडली आहे, गद्दार हा गद्दार असतो, आपल्या महत्वकांक्षा व इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यातील राक्षसी प्रवृत्तीने त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्याला बंड म्हणता येणार नाही. चाळीस आमदार बेईमान झाले म्हणून काही फरक पडत नाही, हे सरकार बेकायदेशीर आहे ,लवकरच मध्यवर्ती निवडणुकाना सामोरे जावे लागेल ,निवडणुका लागल्यानंतर जनता त्यांना बघून घेईल. आमची शिवसेना आमचा परिवार आहे सर्वांचे प्रेम व आशीर्वाद सोबत आहे ,जनता आमच्या पाठीशी असून जनता हेच आमचे दैवत असून हीच आमची खरी शिवसेना आहे. गद्दारांना त्यांची जागा जनता वेळ आल्यावर दाखवून देईल असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोकराव थोरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सदाशिव कराड,उपतालुकाप्रमुख पप्पू महाराज गायकवाड, विजय बडाख, शरद भणगे, प्रदीप वाघ, कैलास भणगे ,दत्तात्रय पटारे, प्रदीप मोहिते, ज्ञानेश्वर गर्जे, अण्णासाहेब कांबळे, बबलू वाघुले, अक्षय कोकणे, मेजर विनोद रणनवरे, सुजित कापसे, राजेंद्र कोकणे,सुनील बोडखे, पाराजी पुंड,शुभम ताके ,राजेंद्र बोडखे, विजय पुंड, महेंद्र शेजुळ ,आलम सय्यद, गणेश वेताळ ,अण्णासाहेब दाभाडे ,आसाराम बोरुडे, बाळासाहेब दुधाळे, दावीत रणनवरे, संतोष पटारे, देविदास नाईक,बापूसाहेब साळवे, यांसह तालुक्यातील विविध शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
चौकट: जनतेशी संवाद , त्यांचे प्रेम व आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून शिवसंवाद यात्रा सुरू असून शिवसेना आमचा एक परिवार आहे, व तो एक संघ आहे त्याला तोडणे कोणालाही शक्य नाही सर्वांचे प्रेम आशीर्वाद सोबत आहे… आदित्यजी ठाकरे.. युवासेना प्रमुख, शिवसेना