टाकळीभान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची गटबाजी, उपशीर्षक- एकाच कामाचे दोनदा उद्घाटन श्रेयवादाची लढाई सुरू…

टाकळीभान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची गटबाजी, उपशीर्षक- एकाच कामाचे दोनदा उद्घाटन श्रेयवादाची लढाई सुरू…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान लोकसेवा महाविकास आघाडीमध्ये फूट पडून सरपंच गट व उपसरपंच गट यामध्ये एकाच विकास कामांचे दोनदा उद्घाटन होऊन या गटबाजी मुळे श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. गुरुवार दि. 21 जुलै रोजी टाकळीभान चे विद्यमान उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी आपले सहकारी ग्रामपंचायत सदस्य मोहन रणनवरे, प्रा. जयकर मगर,सुंदर रणनवरे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे ,विलास सपकाळ या सोबतच्या सहकाऱ्यांबरोबर प्रभाग क्रमांक १ या ठिकाणी रस्त्याच्या कामाचे व इतर विकास कामे, व प्रभाग क्रमांक ६ येथे रस्त्याचे विकास कामाचे उद्घाटन केले तदनंतर शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी 15 वित्त आयोग दलित वस्ती अंतर्गत प्रभाग क्रमांक १ येथे रस्त्याची व इतर विकास कामे, प्रभाग क्रमांक 6 येथे रस्त्याचे उद्घाटन तसेच माळेवाडी येथे अंगणवाडी संरक्षक भिंत तारकंपाउंड चे भूमिपूजन आदी उद्घाटनांचा शुभारंभ माजी आमदार भानुदास मुरकुटे, अशोकचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, सरपंच अर्चनाताई रणनवरे,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, अशोकचे संचालक आप्पा यशवंत रणनवरे, दत्तात्रय नाईक, ग्रामपंचायत सदस्य मयूर पटारे, दीपक पवार, सुनील बोडखे, भाऊसाहेब पटारे, रावसाहेब वाघुले, बबलू वाघुले, अनिल दाभाडे यांच्या हस्ते सरपंच गटाने आपल्या सहकाऱ्यांच्या व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये केले. यामधून त्याच विकास कामांचे उद्घाटन होऊन गटबाजी उफाळून आली आहे. तसेच श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे नागरिक संभ्रमात पडले असून पदाधिकाऱ्यांची श्रेय घेण्याच्या स्पर्धे बाबत चर्चा झडत आहेत.मात्र नेत्यांनी याकडे लक्ष घालवून सर्वाना एकत्रीत करुन गावातील वाद समोचाराने मिटवून सर्वाना बरोबर घेऊन गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण भविष्यात प.स. व जि.प या निवडणूका लागणार आहेत कारण श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान हे गाव राजकारणाला कलाटणी देणारे असून ग्रामपंचायत मोठी असल्यामुळे निधी मोठ्या प्रमाणात येतो लोकसेवा महाविकास आघाडीच्या एक हती सत्ता आहे पण मी मोठा की तु मोठा या श्रेय वादाच्या भोवर्यात अडकून एवढा मोठा निधी येवूनही गावाचा म्हणावा तसा विकास झाल्याचे दिसत नाही याला कारण आपसातील मतभेद म्हणून तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी वेळीच लक्ष घालून आपसातील दोन गटातील वाद मिटवून तेव्हाच खर्या अर्थाने गावाचा सर्वांगिण विकास होईल असे समस्थ ग्रामस्थांचे मत आहे