दादा भुसे मा.कृषी मंत्र्याच्या कार्यकाळातील बी बियाणे, खते, औषधी, बोगस कंपन्यांवर कायदेशीर कारवाई कधी होणार- वसंत मुंडे

दादा भुसे मा.कृषी मंत्र्याच्या कार्यकाळातील बी बियाणे, खते, औषधी, बोगस कंपन्यांवर कायदेशीर कारवाई कधी होणार- वसंत मुंडे
महाराष्ट्रामध्ये २०२० पासून बोगस बियाणे खते औषधे खूप मोठ्या प्रमाणावर विविध राज्यातून कृषि मंत्र्याच्या कार्यालयाचे सहकार्य मुळे बोगस कंपनीने महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ मांडून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलाचा आरोप ओबीसी काँग्रेस विभागाचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला आहे. बोगस बियाणे खत औषधी संदर्भात शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे १५ ते २५ टक्के गुजरात मध्यप्रदेशच्या विविध कंपन्याकडून महाराष्ट्रात परवानगी विना विक्रेत्याकडे माल देऊन काळाबाजार चालू आहे. त्यात शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करून निकृष्ट बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले असून गोगलगायी व इतर रोगामुळे शेतकऱ्याचे आर्थिक पिकांचे नुकसान झाले असून मराठवाड्यात व विदर्भात बियाणे खते कीटकनाशक तपासण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा शासनाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बोगस कंपन्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. १५ ते २५ टक्के हे नापास बियाणे खत औषधे बाजारात आले असून मराठवाडा विदर्भात याचा परिणाम जास्त जाणवत असून यावर तात्काळ बोगस कंपन्या कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना हेक्टर २५००० आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नुकसान झाले असून त्यांचे तात्काळ पंचनामे करून एसडीआरएफच्या निकषांमध्ये बसून शेतकऱ्याला अतिवृष्टीचे अनुदान व खरीप पिक विमा २०२० व २०२१चा तात्काळ वाटप करण्याची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.