निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर मधून राहुरीला येण्यासाठी ज्या बोगद्याचे काम अनेक वर्ष प्रलंबीत होते. ते काम माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांच्या विशेष प्रयत्नाने मार्गी लागले.

निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर मधून राहुरीला येण्यासाठी ज्या बोगद्याचे काम अनेक वर्ष प्रलंबीत होते. ते काम माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांच्या विशेष प्रयत्नाने मार्गी लागले.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेल्या निळवंडे धरणाच्या बोगद्याचे काम आज अखेर मोकळा झाला असून निळवंड्याचे पाणी संगमनेर तालुक्यातून राहुरी तालुक्यात येण्याचा मार्ग आज पुर्ण पणे मार्गी लागला.
ह्या बोगद्याचे कामासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी 9 मे 2022 रोजी निभेरे कानडगाव भागात भेट देऊन जलसपदा विभागाचे अधिकारी व ठेकेदार ह्यांना खडसावले होते व सदर बोगद्याचे काम एक महिन्यात पुर्ण करा असा आदेश दिला होता. श्री तनपुरे ह्यांच्या ह्या आदेशाचे पालन अधिकारी व ठेकेदार ह्यांनी दिलेला शब्द पुर्ण करून आज बोगदा मोकळा झाल्या बद्दल निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील राहुरी तालुक्यातील निभेरे कानडगाव तुळापूर येथील लाभधारक शेतकऱ्यांनी आनंदोस्तव साजरा केला. निळवंडे धरणाच्या कामावर माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच ह्या कामासाठी मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री व जल संपदा मंत्री जयंत पाटील ह्यांचेकडे आग्रह धरून सदर निळवंडे धरणाचे कालव्याचे काम ऑक्टोबर 2022 पर्यंत पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
आज निळवंडे धरणाच्या बोगद्याचे काम पुर्ण मार्गी लागताच निभेरे कानडगाव तुळापूर येथील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामध्ये निभेरे येथील सरपंच राजेंद्र सुखदेव सिनारे, मंजाबापू चोपडे, ज्ञानदेव मुरलीधर सिनारे पो. पा. गोरक्षनाथ लहानू सांगळे शरद सिनारे विजय सिनारे,भारत चद्रभान सिनारे मछिन्द्र नाकाडे महेश साबळे सदस्य रामदास सिनारे,चंद्रकांत विघारे सदस्य ग्रामपंचाय शांताराम सिनारे जिजाबापू सिनारे आनंदा सिनारे कानडगावचे डॉ रवींद्र गागरे लक्ष्मण गागरे पोपट गागरे, जालिंदर गागरे, तुळापूरचे चांगदेव हारदे, भिमराज हारदे,बापू हारदे ह्यांचेसह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर मधून राहुरीला येण्यासाठी ज्या बोगद्याचे काम अनेक वर्ष प्रलंबीत होते. ते काम माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांच्या विशेष प्रयत्नाने मार्गी लागले.