-ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील अन संत समजले म्हणजे भगवंत समजतील

बेलापुर (प्रतिनिधी )-ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील अन संत समजले म्हणजे भगवंत समजतील. त्यामुळे ग्रंथाचा भावार्थ समजुन त्या प्रमाणे आचरण करा असे अवाहन पंढरपूर च्या पहिल्या पायी दिंडीचे मानकरी . ह. भ. प.भानुदास महाराज { हिरवे } बेलापूरकर यांनी केले.
-येथील श्री.हरिहर केशव गोविंद भगवान अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,व किर्तन महोत्सवाचे ३ रे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पूढे म्हणाले—देव ओळखण्यासाठी गुरु करावा लागतो,गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. देवाचे प्रेम आपणाला सांगता येत नाही.देव कोणालाच दिसत नाही.संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना देव समोर आले असतांही ते त्यांना समजले नाही.
साधू, संताचे जीवन आपणाला जगता येणार नाही.आचाराने, विचाराने प्रत्येकाने आपले जीवन जगावे यासाठी संताच्या दिंड्या निघतात.परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संत दुःखावर प्रेम करतात.संताचे चरण घरात आले तिथेच आनंद मिळतो.देव,देश, आणि धर्माची सेवा करा! मी वयाच्या १९ व्या वर्षापासून किर्तन सेवा करतो.माझ्या वडींलाच्या व राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज बेलापूरकर यांच्या जन्मभूमीत किर्तन करण्याचा ” योग” मला आला यांचा आनंद होतो.परमार्थ हा सुखाचा सागर आहे त्याचा अंगीकार करा जिवन आनंदी व सुखमय होईल असेही ते म्हणाले