धार्मिक
मांजरी येथील श्री क्षेत्र चंद्रगिरी महाराज पायी दिंडी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान

राहुरी तालुक्यातील मांजरी येथील श्री क्षेत्र चंद्रगिरी महाराज पायी दिंडी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान
आषाढी पायी दिंडी सोहळा वर्ष १२ वे श्री चंद्रगिरी महाराज देवस्थान मांजरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या विद्यमानाने श्री चंद्रगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच वै.ह.भ.प.बन्सी महाराज तांबे श्री क्षेत्र नेवासा आणि सदिच्छा भेट ह.भ.प. शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र मांजरी ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा पार पडत असून काल दिनांक 29 जून रोजी चंद्रगिरी महाराज देवस्थान मांजरी येथून दिंडी निघाली असून शनिवार दिनांक ९ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल व रविवार दि १० जुलै रोजी सकाळी चंद्रभागेत महाआरती होईल या दिंडीमध्ये मांजरी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतील