महाराष्ट्रराजकिय
कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी हापसे.

कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी हापसे.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ॠषीकेश हापसे यांची मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी नूकतीच निवड करण्यात आली.
दि. २४ सप्टेंबर रोजी नेवासा एस.टी.आगारामध्ये मान्यता प्राप्त कामगार संघटनेचीवार्षिक सर्वसाधारण सभा विठ्ठलराव बोरूडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेत कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी जालिंदर पिटेकर यांची तर सचिवपदी राजेंद्र कोतकर यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी टाकळीभान येथील एस.टी. वाहक ॠषीराज हापसे यांची निवड करण्यात आली. या सभेसाठी सोमनाथ आरगडे, रतन हरकल, विजय लाड, राजेंद्र भुते, राधाकिसन राशीनकर, कडूबाळ सातपुते, शंकर वडगे, संतोष आहेर, सातपुते मेजर, युवराज बोडखे, दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.