
*आळंदी पोलिसांचे नागरिकांत कौतुक रस्त्यावर वाहने लावू नये यासाठी घेतली दक्षता*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी दिनांक 2 आळंदी मध्ये कार्तिक वारी झाल्यानंतर सध्या लग्न सोहळ्यांची रेलचेल चालू आहे बेशिस्त वाहन पार्किंग ने आळंदी नेहमीच मात्र कोंडी होत असते तसेच रस्त्यांवर पार्किंग नसलेल्या जागी चार चाकी वाहने लावल्याने रस्त्याने जाणारे पायी जाणारे यांना रहदारीत अडथळा होतो, आळंदीतील दक्षता कमिटीचे सदस्य डीडी भोसले पाटील यांनी याबाबत गोपनीय बारनीशी अधिकारी श्री मच्छिंद्र शेंडे यांना सूचना देत विनंती केली की आळंदी लग्न समारंभाच्या नावाखाली रस्त्यात कोठेही चार चाकी वाहने लावत आहेत, आपण प्रदक्षिणा मार्ग फक्त न पाहता ,आळंदीतील इतर अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होऊ नये ,नागरिकांना चालण्यास त्रास होउ नये ,तसेच रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी चार चाकी वाहने लावू देऊ नये याबाबत दक्षता घ्यावी, या सूचनाचे स्वीकार करत आळंदी पोलीस यांनी दाखल घेतली, आणि पोलीस व्हॅन च्या ध्वनिक्षेपक माध्यमातून सूचना देत, आळंदी शहरात रस्त्याने पोलीस वाहन फिरवली, पोलीस कर्मचारी स्पीकर च्या माध्यमातून चार चाकी वाहने रस्त्यात पार्क केल्यास कारवाई केली जाईल, असे सूचना देत होते,याचा वचक बसत, आज आळंदीमध्ये रस्ते मोकळे राहिले आणि बेशिस्त वाहने लावणारे यांना जरब बसला, त्यामुळे आज आळंदीत गर्दी असूनही कोठेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही, याबाबत आळंदी पोलिसांचे सर्व नागरिकांत कौतुक आणि समाधान व्यक्त केले जात आहे, यासाठी विशेष दखल घेतली म्हणून आळंदी दक्षता कमिटी सदस्य भोसले पाटील यांचे नागरिक हस्ते परहस्ते आभार ही मानत आहेत,