राजकिय

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो |उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो |उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

 

महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा कायम महत्वपूर्ण आहे…धनंजय मुंडेंचं काम कौतुकास्पद आहे. 

 

 

त्यांच्या वाटेला नेहमी संघर्ष आला असताना सुद्धा बीड जिल्हावासीयांनी त्यांना नेहमीच साथ दिली आहे

 

धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना प्रत्येकला न्याय दिला आहे.

 

बीडमधील जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘धनंजय मुंडेंनी काही दिवसांपूर्वी मला सांगितलं, दादा मला इथं सभा घ्यायची आहे. आम्ही सगळ्यांनी का निर्णय घेतला हे सर्वांनी सांगितलं आहे. राजकारण कशासाठी करायचे असते हे बीडकरांना माहीत आहे. मित्रांनो राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील लोकांचे भलं करायचे काम आम्ही करणार आहोत’

 

‘प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत असतात. आम्ही महापुरुषांना आदराचे स्थान देणारे माणसं आहोत. आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने पुढे चाललो आहे. मला या सभेतून सांगायचं आहे आम्ही जरी महाआघाडीच्या सरकारमध्ये असलो तरी हे सरकार तुमचं आहे’, असे अजित पवार म्हणाले.

 

‘काही कंपन्या म्हणायच्या आम्ही बीड जिल्ह्याचा पीकविमा काढणार नाही. आम्ही बीड पॅटर्न उभा केला. आम्ही सरकारच्या माध्यमातून 1 रुपयात पीकविमा काढायचं काम केलं. 1 रुपयाच्या पिकविम्यामुळे राज्यसरकारच्या तिजोरीवर साडेचार हजार कोटींची जबाबदारी आली आहे, असेही ते म्हणाले.

 

‘आज मोदींचा देशामध्ये करिष्मा आहे. त्यांच्या करिष्म्याचा उपयोग या पुरोगामी महाराष्ट्राला झाला पाहिजे. आज अमेरिका, रशिया, चीननंतर जगामध्ये भारताचा नंबर लागतो, असे अजित पवार म्हणाले.

 

‘बीड जिल्हा हा राजकीय मैत्री जपणारा आहे. बीडमध्ये राजकीय शत्रुत्व झालं नाही. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे वेगवेगळ्या पक्षात होते. दोघे भाजप आणि काँग्रेसमध्ये होते. त्यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांनी शेवटपर्यंत निभावली.

 

‘क्रांतीसिंह नाना पाटील हे ५७ साली साताऱ्यात निवडून आले. तर ६७ साली बीडमधून निवडणूक जिंकले. त्यावेळी बीडकरांनी साताऱ्याचे आहेत म्हणून नाकारले नाही. बीड जिल्हा प्रेमाचा जिल्हा आहे, असे पुढे म्हणाले.

—————————————

कृषीमंत्री धनंजय मुंडे…म्हणाले की

—————————————

बीड जिल्ह्याच्या अनेक विकामकामांना गती दिली, असेही मुंडे म्हणाले. 

 

दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी काय दिले, असा सवालही त्यांनी शरद पवारांना विचारला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना मदत मिळवून दिली असल्याचा उच्चार मुंडेंनी केला. तर धरणात पाणी आणण्यासाठी तुम्ही जे काही करायचे ते करा, असेहीदेखील धनंजय मुंडे भाषणात म्हणाले. 

 

बीडमधील विराट आणि ऐतिहासिक सभा ही विकासाची सभा आहे. मुंडे म्हणाले, अजित पवारांनी मनात आणलं तर बीडमधील दुष्काळ संपुष्टात येईल, असे सांगतानाच अजितदादांमुळे जिल्ह्याच्या विकासास हातभार लागला त्यामुळे आपण त्यांचे नेतृत्व स्वीकारलं आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. शरद पवार हे माझे दैवत असून मी त्यांचं ऐकलंच पाहिजे, तसेच, शरद पवारांनी आपला इतिहास काढला, माझी कर्तबगारी पवारांच्याच पुस्तकात, हाच माझा इतिहास आहे, त्यामुळे प्रश्न कसे सोडवायचे आपल्याला चांगलेच माहीत आहे, असे मुंडे म्हणाले. 

 

शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात माझ्या विधानपरिषदेतील कामगिरीचा उल्लेख असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवर मुंडे म्हणाले, मला पहाटे उठायची सवय नाही त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नसल्याचा मिश्किल टोला मुंडेंनी अजित पवारांना लगावला. तर अजित पवारांमुळेच आपण निवडून आल्याचे मुंडेंनी सांगितले

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे