गाव व परिसराला दुषित पाणी पुरवठा होण्याचे कारण काय ?नागरीकांचा सवाल तातडीने टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश

गाव व परिसराला दुषित पाणी पुरवठा होण्याचे कारण काय ?नागरीकांचा सवाल तातडीने टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश
गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीतुन गेल्या दोन महीन्यापासुन दुषित पाणी पुरवठा केला जात असुन दुषित पाणी येण्यामागील नेमके कारण काय आहे? असा सवाल माजी सरपंच भरत साळूंके व माजी रविंद्र खटोड यांनी केला आहे. गेल्या काही दिवसापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी होत्या तसेच याबाबत रविंद्र खटोड, भरत साळुंके, सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी ग्रामपंचायत कडे तोंडी तक्रार केली होती.या सर्व तक्रारीची दखल घेत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठ्या बाबत तक्रारी संदर्भात ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली होती.त्या वेळी पाण्यात टी सी एल तुरटी टाकण्यात अडचण येते काय ? नळाला क्षारयूक्त पाणी का येते? असा सवाल चंद्रकांत नाईक यांनी केला तर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीला लिकेज असल्यामुळे दुषित पाणी येत असुन दोन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या चांगल्या प्रतीच्या तुरटीचा वापर का केला गेला नाही तसेच फिल्टर दुरुस्ती केव्हा होणार काम पुर्ण झाले नाही तर ठेकेदाराला बिल अदा कसे केले असा सवाल नवले यांनी केला. बेलापुर गाव व परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकुण बारा टाक्या असुन या टाकीची बऱ्याच दिवसापासुन स्वच्छता केली नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली असुन टाक्या सफाईचे काम सुरु करण्यात आलेले असून तातडीनसर्व पाणी टाकी साफ केली जाईल असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वेळोवेळी पाणी तपासणी केली पाहीजे परंतु तसे होत नाही पाण्यामुळे आजार वाढत असल्याच्याही तक्रारीचा सूर या वेळी आळविण्यात आला या वेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की गावाला चांगले पाणी पुरवठा कसा होईल याची दक्षता घेतली जाईल स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध आहे.पाटा मधून तळ्यात आलेले पाणी देखील दूषित आहे त्याबाबत इरिगेशन खात्या कडे लेखी तक्रार केली आहे. पाणीपुरवठा बाबत काही सुचना आसेल तर त्याचीही दखल घेतली जाईल असेही ते म्हणाले.उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की, गावात दूषित पाणी पुरवठा व्हावा अशी कुठल्याच पदाधिकारी अथवा सदस्याची इच्छा नसते.स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व उपाय योजना त्वरित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.पाणी पिण्यास योग्य की अयोग्य हे तपासणी करुन अहवाल देण्याची जबाबदारी आरोग्य विभाग व जलरक्षक यांची असताना पाणी पिण्यास योग्य कि अयोग्य असा कोणताच अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाकडे आला नसल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले त्या वेळी ओ टी घेण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल साळूंके यांनी विचारताच ओ टी काय असते असा प्रतिप्रश्न सरपंच साळवी यांनी केला या वेळी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन मिळावे अशी मागणीही करण्यात आली.ग्रामपंचायतीने स्वतः हुन पाणीपुरवठा बाबत बैठक बोलावली या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी सदस्य मुस्ताक शेख शफीक बागवान पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद राम पोळ प्रसाद खरात गोपी दाणी ईस्माईल शेख समीर शेख गफुर शेख अजीज शेख सचिन अमोलीक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर महेंद्र मीश्राम प्रशांत गायकवाड तान्हाजी गडाख संतोष शेलार पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम अजीज शेख रमेश अमोलीक रेमेश कुमावत बाबुलाल पठाण गोविंद खरमाळे सतीश मोरे तसवर बागवान आदि उपस्थित होते.