मुस्लिम विरोधी वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांचे पोलीस आयुक्तांना निवेदन*

*मुस्लिम विरोधी वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांचे पोलीस आयुक्तांना निवेदन*
पुणे – भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मुस्लिमांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर आणि इस्लाम विषयी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण होईल हा हेतू त्या वक्तव्यातून प्रकर्षाने निर्माण होतो या वक्तव्याचा निषेध म्हणून तसेच नुपूर शर्मा यांना गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी पुण्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या वतीने पुण्याचे सहपोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना संबंधित विषयाचे निवेदन सादर करण्यात आले.
सर्व धर्मनिरपेक्षतावादी लोकशाही पक्ष संघटनांची शिखर संघटना असलेल्या संविधान परिवार या संस्थेच्या माध्यमातून पोलीस सह आयुक्त नामदेवराव चव्हाण यांची भेट घेऊन सदर गंभीर घटनेप्रकरणी तात्काळ उचित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आयुक्त यांनीदेखील तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश याप्रकरणी दिले.
माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे, रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष उमेश चव्हाण, भीम आर्मीचे दत्ता पोळ, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अंजुम इनामदार, माजी नगरसेवक हनिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी, आश्विन दोडके, रिपब्लिकन जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष शैलेंद्र मोरे यावेळी प्रमुख उपस्थित होते.