आरोग्य व शिक्षण
येथिल न्यू इंग्लिश स्कूल येथे मार्गदर्शन करतांना माजी विद्यार्थी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश बोर्डे,

शिरेगाव(ता नेवासा) येथिल न्यू इंग्लिश स्कूल येथे
मार्गदर्शन करतांना माजी विद्यार्थी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश बोर्डे,उपस्थित मान्यवर
सोनंई – परिश्रम व जिद्दीच्या जोरावर आपण आपले ध्येय गाठु शकते.यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपण ग्रामीण असल्याचा न्युनगंड बाळगु नये.असा सल्ला शिरेगाव शाळेचे माजी विद्यार्थी तथा
एपीआय प्रकाश बोर्डे यांनी दिला.
ते शिरेगाव(ता नेवासा) येथिल न्यू इंग्लिश स्कूल येथे
माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल होते.
यावेळी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे मनोज गोसावी ,
शाळा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नयुम इनामदार,
खेडले परमानंद चे सरपंच राजेंद्र राजळे,भाऊसाहेब राजळे,गोविंद फुणगे,संभाजी शिंदे,रमेश बनकर, अल्लू भाई इनामदार, ताहीर इनामदार, प्रल्हाद अंबिलवादे व्यासपिठावर उपस्थित होते.
अतिशय हालाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीमध्ये आई-वडिलांनी माझे शिक्षण केले. त्यांच्या कष्टाची जाणीव धरून मी माझे प्रयत्न सोडले नाही.अपयशाने खचलो नाही.अविरतपणे कष्ट केल्यास फळ नक्कीच मिळते.आई-वडिलांचे व गुरुजनांचे आशीर्वाद व कष्ट व जिद्दीच्या जोरावरच ध्येय गाठु शकले,असे बोर्डे म्हणाले.
सोनई पोलिस स्टेशनचे ए.पी.आय सचिन बागुल यांनी स्पर्धा परिक्षेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी माजी विद्यार्थी अविनाश जाधव,किरण जाधव,माजी शिक्षक विक्रम चौधरी, बी.एस. दरंदले आदींनी मनोगत व्यक्त केले.