संक्रापुर सोसायटीत महेबुब शेख नबाजी जगताप संजय जगताप गटाला अकरा तर रामा पांढरे गटाला दोनच जागा

बेलापुर (प्रतिनिधी )-संक्रापूर तालुका राहुरी येथील संक्रापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत चेअरमन नबाजी जगताप महेबुब शेख संजय जगताप यांच्या संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाने निर्विवाद बहुमत मिळविले असुन विरोधी सरपंच रामा पांढरे यांच्या संक्रेश्वर मंडळाला केवळ नशिबाने साथ दिल्यामुळे दोनच जागावर समाधान मानावे लागले संक्रापुर सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली एकुण १३ जागेकरीता २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते चेअरमन नबाजी जगताप यांचा संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळ तर सरपंच रामा पांढरे यांचा संक्रेश्वर जनसेवा मंडळ अशी दोन गटात ही निवडणूक होती एकुण २२९ मतदारापैकी २२०मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला माजी ग्रामविकास अधिकारी प्रभाकर होन यांनी वयाच्या ९० व्या वर्षी आपला मतदानाचा हक्क बजावला व सायंकाळी त्यांचे निधन झाले दोन्ही मंडळाकडून विजयाचे दावे केले जात होते एका मतदाराला तेरा मते देण्याचा अधिकार असल्यामुळे मते विभागली जाण्याची दाट शक्यता होती परंतु मतदारांनी केवळ चिन्ह पाहुन मतदान केल्यामुळे संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या तर चार जणांना समसमान मते मिळाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी नावाच्या अद्याक्षरानुसार दोन उमेदवारांना विजयी घोषीत केले संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे शेख महेबुब इमाम ,जगताप बाबासाहेब संपत , जगताप त्रिंबक भाऊसाहेब ,सालबंदे भरतरीनाथ महीपती ,होन ज्ञानदेव भाऊसाहेब ,जगताप राजेंद्र किसन ,चोखर बाळासाहेब संतु पत्रकार देविदास अगस्ती देसाई ,खेमनर सिताबाई बबन ,चव्हाण योगीता यमासाहेब ,भोंगळे शशिकांत सोपान तर चव्हाण जालींदर चव्हाण बापू पांढरे साहेबराव व शेख कादर या चौघांना समान १०४मते मिळाली होती त्यामुळे बाराखडी नुसार प्रथम असणाऱ्या दोन उमेदवारांना विजयी घोषीत करण्यात आले त्यात संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे जगताप पंढरीनाथ किसन व चव्हाण जालींदर तुकाराम हे विजयी झाले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले किरकोळ बाचाबाची वगळता निवडणूक शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी डी आर कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आर पी अगरकर यांनी काम पाहीले त्यांना एस पी भोसले गीताराम काळे प्रकाश नलगे यांनी सहकार्य केले पोलीस उपनिरीक्षक निरज बुकील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी ऐ कटारे पोलीस नाईक पी जी आहेर जे एम धायगुडे पोलीस पाटील विजय गोसावी यांनी चोख बंदोबस्त ठेवला या निवडणूकीत पंढरीनाथ जगताप व राजेंद्र जगताप हे सख्खे भाऊ विजयी झाले जनशक्ती विरुध्द धनशक्तीच्या लढाईत जनशक्ती विजयी झाल्याचा दावा संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाचे नेते नबाजी जगताप यांनी केला असुन मागील कार्यकाळात केलेल्या कामामुळेच सभासदांनी पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या ताब्यात सत्ता दिली असल्याचा दावा माजी सरपंच संजय जगताप महेबुब शेख व नबाजी जगताप यांनी केला आहे .