मुळा कारखान्यावर उदयन गडाख यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन.

मुळा कारखान्यावर उदयन गडाख यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन.
सोनई-सोनई मुळा कारखाना येथे नाथपंथी डवरी गोसावी चषकाचे उदघाटन करताना मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या हस्ते झाले.
मुळा कारखाना येथील न्यु इंग्लीश
स्कुल शाळेच्या मैदानावर नाथपंथी डवरी समाजाच्या युवकांच्या वतीने भव्य अशी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे.या स्पर्धत प्रथम बक्षिस युवा नेते उदयन गडाख यांनी 25,111 तर दुसरे बक्षिस प्रदेश काॅग्रेस महिला सरचिटणिस अॅड.रेखाताई चव्हाण यांनी 21,112 दिले आहे.तर तिसरे बक्षिस प्रा.सुभाष रामचंद्र भोसले कार्याध्यक्ष अखिल भारतीय हिंदु नाथपंथी समाज संघटना यांनी 11,111 रूपये दिले आहे.वैयक्तिक बक्षिसे जि.प.सभापती सुनिल गडाख 11 हजार,महादजी शिंदे 21 हजार,हर्षल निमसे 15 हजार,अनिल रमेश शिंदे अकरा हजार,संतोष गोकुलदास चव्हाण 11हजार,ज्ञानेश्वर शिंदे 15 हजार,उदय पालवे 15 हजार तसेच राजेंद्र गुगळे,महादेवजी शिंदे,अजय विठ्ठल सावंत,अनिल शेगर,धनजंय वाघ,बापु शिंदे सर यांनी प्रत्येकी पाच हजार रूपये बक्षिस दिले आहे.आज सकाळी युवानेते उदयन गडाख यांनी बॅटिग करत क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन केले.
यावेळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर,बाबा शिंदे,नाथा बाबर,विठ्ठल शेगर, अगीनाथ शेगर, बाबाजी शेगर, संतोष चौगुले,पिराजी शिंदे, विजय शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
कोट नाथापंथी डावरी गोसावी समाजातील समाजाला वेळोवेळी मदत करून समाजाला योग्य मार्गदर्शनं करणारे समाजाला मुख प्रवाहात आणण्याचा पर्यन्त करणारे महादेव शिंदे साहेब सहायक आयुक्त मुबंई महानगरपालिका