आरोग्य व शिक्षण
टाकळीभानचे आंगणवाडी केंद्र उकिरड्याच्या विळख्यात, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, बालकांच्या आरोग्याला धोका.

टाकळीभानचे आंगणवाडी केंद्र उकिरड्याच्या विळख्यात, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, बालकांच्या आरोग्याला धोका.


ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आतिक्रमणाचा विळखा घट्ट होत आसतानाच आंगणवाडी केंद्राच्या परीसरातही आतिक्रमण होत आसताना आंगणवाडी केंद्रच उकिरड्यांच्या विळख्यात सापडले जात आसताना चिमुरड्यांचाही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिमुकल्यांना बालवयातच शिक्षणाची गोडी निर्माण होवुन सुजान नागरीक तयार व्हावा या हेतुन गावागावात आंगणवाडी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. पुर्व प्राथमिक ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना या केंद्रामध्ये पुर्व प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेचा पाया पक्का होत आसल्याचे दिसुन आलेले आहे.
येथील १२ आंगणवाडी केंद्रांना सरकारी खर्चाने ईमारती बांधुन देण्यात आलेल्या आहेत. चिमुकल्यांना खेळण्या बागडण्यासाठी त्या प्रमाणात मैदानही देण्यात आलेल आहे. माञ मैदानाला संरक्षक भिंत नसल्याने त्या त्या परीसरातील नागरीक आंगणवाडी केंद्राच्या जागेवरच अतिक्रमण करताना दिसत आहे. काही ठिकाणी उकिरडे टाकणे, गुरेढोरे बांधणे असे प्रकार होत आहेत.
येथील माळीवाडा परीसरात आसलेल्या आंगणवाडी केंद्राला संरक्षक भिंत नसल्याने त्या जागेत मोठे अतिक्रमण झाले आहे. आंगणवाडी केंद्राच्या ईमारती भोवती उकिरड्यांचा विळखा पडलेला आहे. त्यामुळे आंगणवाडी केंद्रातील चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. केंद्राच्या शेजारच्या परीसरातील नागरीक आंगणवाडी सेविका व मदतनिसांना दाद देत नसल्याने गेल्या चार महीण्यापुर्वी हे आतिक्रमण काढण्यात यावे आशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्जाद्वारे केली आहे. माञ ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भुमिका घेत चिमुकल्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आसल्याने अतिक्रमण धारकांचे मनोबल वाढत आसल्याने संपुर्ण आंगणवाडी केंद्रच अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Rate this post