महीला दिनानिमीत्त बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्या व कर्मचारी महीलांचा सन्मान

महीला दिनानिमीत्त बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्या व कर्मचारी महीलांचा सन्मान
बेलापूरः (प्रतिनिधी )-जागतीक महीला दिनानिमित्त केला जाणारा महीलाचा सन्मान हा त्यांचा उत्साह वाढविणारा असुन केवळ महीला दिनीच नाही तर वर्षभर महीलांचा आदर ,सन्मान केला पाहीजे असे मत सरपंच महेंद्र साळवी यांनी व्यक्त केले महीला दिनाचे औचित्य साधुन महीला ग्रामपंचायत सदस्या तसेच महीला ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सौ.शिला राम पोळ ह्या होत्या.या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे जेष्ठ पत्रकार देविदास देसाई सौ .प्रियंका कुऱ्हे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी ग्रामपंचायत महिला सदस्या तबस्सुम बागवान,स्वाती अमोलिक,प्रियंका कु-हे ,सुनीता बर्डे,यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी उज्वला मिटकर,निर्मला गाढे,सुशिला खरात,कलाबाई शेलार,निर्मला तेलोरे,निर्मला भिंगारदिवे,कविता भिंगारदिवे,सगुणा तांबे,सरस्वती बागडे,लता गांगुर्डे आदिंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी ,सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,पञकार दिलीप दायमा, किशोर कदम दादासाहेब कुताळ ,अजीज शेख,सुधीर तेलोरे,राज गुडे आदी उपस्थित होते.