
टाकळीभान येथील आंगणवाडीच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरवात.
येथील वॉर्ड क्रमांक. ४ मधील परदेशी गल्ली मधील अंगणवाडीच्या दोनशे फूट लांबीच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ सरपंच अर्चना रणनवरे, आंगणवाडी सेविका संगिता जोशी व मदतनिस अलका सिध्देश्वर यांच्या शुभहस्ते आणि लोकसेवा महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.
या अंगणवाडी लगतच रहदारीचा रस्ता आसल्याने आंगणवाडीच्या चिमुकल्यांना मोकळ्या मैदानात बागडण्यास आडचणी येत होत्या. गेल्या आनेक दिवसांपासुन या आंगणवाडी केंद्राला संरक्षक भिंत व्हावी अशी मागणी केली जात होती. अखेर त्या मागणीला आज मुर्त स्वरुप आले आहे. यावेळी लोकसेवा महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, शिवाजी शिंदे, उपसरपंच कान्हा खडागळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, प्राचार्य जयकर मगर, दत्ताञय नाईक, शंकर पवार, अबासाहेब रणनवरे, बाबासाहेब बनकर, मोहन रणनवरे, भाऊसाहेब पटारे, भारत परदेशी, दत्ताञय बोडखे, बंडु वेताळ, महेश लेलकर, शिवाजी पटारे, रामदास जाधव उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने होणाऱ्या विकासकामात स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच कामे केली जातील त्यामुळे स्थानिक नागरीकांची गैरसोय होणार नाही व विकासकामांना गती मिळुन दर्जेदार कामं होतील यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
मयुर पटारे – सदस्य ग्रा.प.टाकळीभान
Rate this post