राहुरीचे गट विकास अधिकारी गोविंद खामकर ह्यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती.

राहुरीचे गट विकास अधिकारी गोविंद खामकर ह्यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती.
पंचायत समिती राहुरीचे गट विकास अधिकारी गोविंद खामकर ह्यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या पदावर त्यांना बढती मिळाल्या बद्दल त्यांना आज पंचायत समितीचे माजी पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी ह्यांचे वतीने निरोप देण्यात आला.
गोविंद खामकर हे 2018 साली राहुरी पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी म्हणून ते बदलून आले होते.4 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पंचायत समिती मध्ये काम करताना प्रशासन व पदाधिकारी ह्यांचा उत्कृष्ठ समनव्य साधतं आपला कार्यकाळ पुर्ण केला. गेल्या अडीच वर्षांपासून तालुक्याचे आमदार पदी प्राजक्त तनपुरे निवडून आले त्यानंतर राज्यमंत्री झालेपासून तालुक्यात अनेक विकास कामे पुर्ण झाली काही सुरु आहे. कोरोना सारख्या महामारी काळात त्यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात अतिशय चांगले काम प्रशासनाकडून करवून घेतले. त्यांच्या ह्या कार्यावर प्रभावित होऊन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचेकडे गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाध्यक्ष शरद पवार ह्यांनी सोपवल्या नंतर तेथे रिक्त असलेल्या जागी गोविंद खामकर ह्यांना बढती देऊन एकप्रकारे त्यांच्या कामाचे कौतुक करुन मोठी जबाबदारी दिली आहे ते ती निश्चित पार पाडतील असा विश्वास पंचायत समितीचे गट नेते रवींद्र आढाव ह्यांनी सत्कार प्रसंगी बोलून दाखवला.
गट विकास अधिकारी गोविंद खामकर ह्यांना त्यांचे बढती बद्दल पदाधिकारी व प्रशासन ह्यांचे वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी सौं रेश्माताई खामकर ह्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती सौं बेबीताई सोडनर उपसभापती प्रदीप पवार सौं सुनीता निमसे सौं मनीषा ओहळ सदस्य बाळासाहेब लटके रवींद्र आढाव जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे भारतशेठ भुजाडी सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेजी, शाखा अभियंता संजय खिळे उपभियंता पाणी पुरवठा गडढे साहेब गट शिक्षणाधिकारी सुनिल सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ वृषाली गायकवाड राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचे स्वीय सहायक रवींद्र मांडे अधीक्षक भाऊसाहेब राहिज आदि सह कर्मचारी उपस्थित होते.
गट विकास अधिकारी गोविंद खामकर ह्यांची गोंदिया जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बढती झाल्या बद्दल त्यांचा पंचायत समितीचे पदाधिकारी व प्रशासना चे वतीने सत्कार करताना सुरेश निमसे रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके भारतशेठ भुजाडी बेबीताई सोडनर अनंत परदेशी रवींद्र मांडे आदि.