संगमेश्वर तिळापूर मध्ये हजारो भाविक भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन.

संगमेश्वर तिळापूर मध्ये महादेवाचे घेतले हजारो भाविक भक्तांनी दर्शन
राहुरी तालुक्यातील येथे मुळा व प्रवरा नद्यांच्या संगमावर वसलेले पुरातन काळातले महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीची यात्रा भरवली जाते. दोन्ही नद्यांच्या संगमावर मनमोहक मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणामध्ये महाशिवरात्रीच्या परवणीवर महादेवाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते. यात्रेमध्ये फिरवून पंचकृषी तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी त्यांचा आनंद घेतला. संतांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या संगमेश्वराच्या प्रसन्न वातावरणामध्ये अवघ्या जगाला ज्ञान देणारे ज्ञानेश्वर महाराज व त्यांचे भावंड याच महादेव परिसरामध्ये येऊन गेल्याची आख्यायिका आहे. पंचकृषीचे हे जागृत देवस्थान व नागरिकांची आराध्य देवस्थान म्हणून या देवस्थान जवळ माथा टेकण्यासाठी हजारो भक्त येत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी भाविक भक्त नवसातून उतराई होण्यासाठी दिवसभर खिचडीचे वाटप करत असतात या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट असे नियोजन केलेले असते. या यात्रेच्या वेळेस राहुरी पोलीस स्टेशनच्या मार्फत बंदोबस्त दिलेला असतो. दर्शनासाठी आलेल्या सर्व नागरिकांचे स्वागत तसेच देवस्थान जवळ येऊन देणगी देणाऱ्या नागरिकांचे देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांनी आभार मानले.