किर्तन , प्रवचन हे समाज प्रबोधनाचे व धर्म प्रसाराचे साधन आहे त्याचा तमाशा करु नका -महंत उध्दव मंडलीक महाराज.

किर्तन , प्रवचन हे समाज प्रबोधनाचे व धर्म प्रसाराचे साधन आहे त्याचा तमाशा करु नका -महंत उध्दव मंडलीक महाराज.
बेलापुर -किर्तन प्रवचन हे समाज प्रबोधनाचे धर्म प्रसाराचे साधन आहे परंतु काही लोक वायफळ गोष्टी सागुंन त्यास करमणूकीचे साधन बनवू पहात आहे किर्तन प्रवचनाचा तमाशा करु पहात आहेत हे दुर्दैव आहे अशी खंत तुकाराम महाराज संस्थानचे मठाधीपती महंत उध्दव महाराज मंडलीक यांनी व्यक्त केली .
उक्कलगाव येथील हरिहर भजनी मंडळ व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री हरिहर
केशव गोविंद भगवान मंदिराच्या
प्रांगणात आयोजित अखंड हरिनाम
सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी काल्याच्या
किर्तनात भाविकांना उपदेश करताना ते बोलत होते. “चला बळ गाई, बैसो जेऊ
एके ठायी…बह केली वणवण पायपिटी लाभलेली
जाला सिण….खांदी भार पोटी भक, ते
काय खेळायाचे सुख,..तुका म्हणे धावे, उक्कलगावला
मग अवघे बरखे। या संतश्रेष्ठ तुकाराम
महाराजांच्या अभंगावर निरुपण करत
त्यांनी काल्याचे महत्व विषद केले.मंडलीक महाराज पुढे
म्हणाले,की माणूस संस्कृती विसरत चालला आहे संस्कृती विसरलो की विकृती निर्माण होते काम क्रोध मोह मत्सर या गोष्टीवर नियंत्रण मिळविण्याचे शिकाल तरच जिवनात यशस्वी व्हाल शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे त्यामुळे आपल्या मायेपोटी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवु नका आपला मोह माया सोडून मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवा ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील समाजाला पोषक असणाऱ्या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये आहेत .परंतु काही लोक ग्रंथ समजुन सांगतांनाही तमाशाचे स्वरुप आणतात हे चुकीचे आहे धर्माचे रक्षण व प्रसार करणारांना त्याचे भान असले पाहीजे कष्टाने मिळविलेले धन हे लक्ष्मी असते तर अन्य मार्गाने मिळविलेले धन हे माया असते हीच माया सुखाने झोपूही देत नाही व जगुही देत नाही अन व्यवस्थित खाऊही देत नाही हवा पाणी जमीन प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घ्या मन अःतकरण शुध्द ठेवा असे सांगुन भगवान श्रीकृष्ण जन्माचा ओघवत्या
भाषेत आढावा घेताना त्यांनी अधुन मधून विविध दाखलेही दिले. उक्कलगाव श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिराचे आणि आपले कौटुंबिक नाते असल्याचा
महाराजांनी आवर्जून उल्लेख करत हरिहर भजनी मंडळ व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.
ते सांदीपानी गुरुकुल आश्रम पावबाकी, संगमनेर येथील भजनी मंडळाची लाभलेली साथ, समोर उपस्थित पाच हजारांचा जनसमुदाय यामुळे उक्कलगावला पंढरीचे स्वरूप आले होते.
हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व ग्रामस्थांच्या वतीने सात दिवस चाललेला हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. दिवसागणीक भाविकांची संख्या वाढत गेली
त्यामुळे तरुणांचाही उत्साह वाढत
जाऊन अतिशय भक्तिमय वातावरणात कोणतेही गालबोट न लागता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.गावातील विविध मंडळे, पंचक्रोशितील भजनी मंडळे, प्राथमिक व माध्यमिक
शाळा, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी,
मंडप सेवा, जार सेवा पत्रकार या सर्वांनीच आपापल्या पातळीवर सहकार्य केल्याने
उक्कलगावचे पहिल्याच वर्षी सप्ताहाने कळस गाठला.
यावेळी पं.स.माजी सभापती
इंद्रनाथ पा.थोरात, अशोकचे ज्येष्ठ
. संचालक रावसाहेब पा.थोरात, पं.स.माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या हस्ते मंडळाची सप्ताहात व्यासपीठ चालक म्हणून काम पहाणारे नामदेवकाका मोरे, उल्हास महाराज तांबे, बाबा महाराज ससाणे,
मृदंगाचार्य, गायनाचार्य, हार्मोनियम
उछालगाव वादक, देवस्थानसाठी स्वमालकीची
चाललेला जागा देणारे श्री.जगदीश कुलकर्णी
. दाम्पत्य, स्वच्छता कर्मचारी इम्तीयाज शेख विनामुल्य मंडप सेवा
वाढत देणारे सुनील व अनिल गवळी, भजनी मंडळ व अन्य मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.