संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वांबोरीत अभिवादन
संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वांबोरीत अभिवादन
वांबोरी मध्ये हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख दिपकराव साखरे, शहराध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब सत्रे, तालुका सचिव भरत सत्रे, रामकिसन कुऱ्हे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच मराठी मनावर राज्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणापेक्षा समाजकार्यावर भर देऊन त्यांनी समाजात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन जनमानसात चेतना जागविली. आपण करत असलेल्या कार्यातून समाजाचे भले झाले पाहिजे, त्यातून गरजूंना आधार मिळाला पाहिजे, अशी शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ देणारे प्रेरणास्थान म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय. मराठी माणसाला मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन अशोकराव तुपे यांनी केले.