राहुरी तालुक्यात या ठिकाणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग गुन्हा दाखला

राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द परिसरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगाला नको तिथे हात लावून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी राहुरी खुर्द ते राहुरी शहर दरम्यान घडलीय.
दिनांक ६ एप्रिल रोजी फिर्यादी यांची चारचाकी गाडी खराब झाली होती. ती गाडी फिर्यादीने नितीन शहाणे यांच्या दुकानासमोर लावली होती. गाडी रिपेअर करण्यासाठी फिटर घेऊन येऊ असे नितिन शहाणे यांनी सांगितले. त्यानूसार नितीन शहाणे हे त्या अल्पवयीन मुलीला घेऊन त्यांच्या मोटरसायकलवर राहुरी खुर्द येथील स्टार बॅटरी नावाच्या दुकानात गेले. तेथून ते फिटर घेऊन राहुरीकडे येत होते.
सायंकाळी साडेपाच ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास राहुरी खुर्द येथील स्टार बॅटरी दुकान ते राहुरी शहरातील नविपेठ भागातील साई अलंकार दुकान दरम्यान नितीन शहाणे हे मोटरसायकल चालवीत होते. त्यांच्या पाठीमागे ती १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बसली. तिच्या पाठीमागे आरोपी बसला होता. त्यावेळी आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घरी गेल्या नंतर त्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आई वडीलांना सांगितला.
त्या मुलीच्या आईने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोबीन अहमद शेख राहणार राजवाडा, कब्रस्थान रोड, राहुरी. याच्या विरोधात विनयभंग सह बालकांचे लैगीक अत्याचार कायदा २०१२ चे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.