ब्राम्हणी इतर गांवे व वांबोरी पाणी योजना मंजुरीसाठी १३१ कोटी ६७ लक्ष निधीसाठी तांत्रिक समितीची मान्यता

ब्राम्हणी इतर गांवे व वांबोरी पाणी योजना मंजुरीसाठी १३१ कोटी ६७ लक्ष निधीसाठी तांत्रिक समितीची मान्यता
महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा विभागा मार्फत जलजीवन मिशन योजने अंतर्गत राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व इतर ६ गावांसाठी व वांबोरी व वांबोरी परीसरातील वाडयावस्त्यांकरीता प्रति माणसी ५५ लिटर प्रमाणे मुळा धरणातुन पाणी योजनेस शासनाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली असल्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील वाड्या वस्त्यावरील तसेच ब्राम्हणी व इतर ६ गांवे योजनेमध्ये चेडगांव ,मोकळओहळ,उंबरे, कुक्कडवेढे, सडे व पिंप्रीअवघड या गावांचा समावेश असुन त्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्ताव शासनास सादर केला होता. याबाबत विविध सुचना संबधीत अधाका-यांना केल्या होत्या तसेच याबाबत सर्व उच्चपदस्थ अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे पाधिकारी यांचेबरोबर संयुक्त बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार अंतिम प्रस्ताव शासनास सादर केला होता. जलजीवन मिशन तांत्रिक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेला तांत्रिक मान्यता दिली असुन ब्राम्हणी व इतर ६ गावे या योजनेकरीता रु.७३ कोटी ४७ लक्ष रु निधीला व वांबोरी योजनेसाठी रु.५८ कोटी २० लक्ष रु.निधीला तांत्रिक समितीने मान्यता दिली असुन लवकरच त्या कामांची प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे नामदार तनपुरे यांनी सांगितले. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी ,उंबरे ,चेडगांव ,कुक्कडवेढे ,मोकळओहळ,सडे,पिंप्रीअवघड या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नव्हती. या गावातील नागरीकांची ब-याच वर्षापासुन पाणी योजनेची मागणी होती. महाविकास आघाडी सरकार येताच या योजनेच्या मंत्रालय स्तरावर मंत्री तनपुरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन बैठका घेवुन ह्या योजना तांत्रिक समितीच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. नुकतीच जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पाणी योजनांना तांत्रिक मान्यता दिलेल्या आहेत. लवकरच पुढील प्रशासकीय मान्यता होवुन पुढे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया होणार असल्याचे नामदार तनपुरे यांनी सांगितले. या नवीन योजनेमुळे ब्राम्हणी उंबरे परीसर व वांबोरी परीसर या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याने निवडणुकीपुर्वी नामदार तनपुरे यांनी या भागातील नागरीकांना योजना मंजुर करणेचा शब्द दिल्याप्रमाणे योजनेच्या मंजुरीमुळे ब्राम्हणी व इतर ६ गांवे परीसरातील तसेच वांबोरी व वांबोरी परीसरातील नागरीकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.
राहुरी प्रतिनिधी