पुणे विद्यापीठांमध्ये कालपासून सुरू असलेल्या उपोषणाची यश मिळाल्याचे समाधान -संदीप (आबा )चोरमले

पुणे विद्यापीठांमध्ये कालपासून सुरू असलेल्या उपोषणाची यश मिळाल्याचे समाधान -संदीप (आबा ) चोरमले
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे कालपासून सुरू असलेल्या उपोषणाचा आज शेवट झाला. प्रभारी कुलसचिव श्री खरे यांनी आज विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द दिला ज्यामध्ये प्रामुख्याने ऍडमिशन ची तारीख वाढवून 15करण्यात आली तसेच डबल मास्टर्स करू इच्छिणाऱ्या मुलांना वस्तीगृह सुविधा मिरीट प्रमाणे देण्याची देखील मागणी मान्य केली आहे. विद्यापीठाच्या 286 व्या परिपत्रकातील कलम क्रमांक 3(4) मधील मुद्दा आगामी मॅनेजमेंट कौन्सिल च्या मीटिंगमध्ये मांडून विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ अशी ग्वाही प्रभारी उलसचिव यांनी दिली. यावेळी मी आणि उपस्थित विद्यार्थी कुलसचिव यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी हे उपोषण येथेच थांबवत आहे असे संदीप (आबा )चोरमले यांनी बोलताना सांगितले. येणाऱ्या पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास आपण याच प्रमाणे आपल्या मागण्या मांडत राहू असेही संदीप (आबा)चोरमले यांनी म्हटले. तसेच सर्वच विद्यार्थी यांनी न्याय हक्कासाठी एकजुटीने साथ दिल्याने ही प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.