वडिलांचा खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक; दृश्यम मूव्ही सारखे मृतदेहाची विल्हेवाट.

वडिलांचा खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक; दृश्यम मूव्ही सारखे मृतदेहाची विल्हेवाट.
*वडिलांचा खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक महाळुंगे पोलिसांनी केली दोन तासात अटक कारवाई*
चाकण जवळील निघोजे गाव तालुका खेड येथील फरसाण व्यावसायिक धनंजय बनसोडे यांची हत्या करून दोन सख्या भावांनी प्रेताची विल्हेवाट लावण्याचा फिल्मी स्टाईलने प्रयत्न केला.
सदरबाबत माहिती अशी की धनंजय बनसोडे हे फारसं व्यवसायिक आहे त्यांची फेसबुकच्या माध्यमातून नागपूरच्या एका महिलेची मैत्री झाली आणि प्रेम संबंध जोडले सदर प्रकार त्यांच्या मुलांना लक्षात आल्यावर मुलगा सुजित धनंजय बनसोडे वै बावीस आणि अभिजीत धनंजय बनसोडे व 18 यांचा याबाबत आक्षेप होता वडिलांना सांगूनही वडील ऐकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये धनंजय बनसोडे यांनी नागपूर बनसोडे यांनी त्यांच्या नागपूर येथील संबंधित प्रेमिका हिला माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते,
दरम्यान दि, 15 12/ 2022 रोजी 11 वाजता चे सुमारास पासून ते दिनांक 16 /12 /2022 रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत च्या काळामध्ये धनंजय बनसोडे कुठेतरी निघून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली, प्रथम मानव मिसिंग रजिस्टर 366 /२०२२ प्रमाणे मिसिंग रजिस्टर मध्ये महाळुंगे पोलिसांनी नोंद घातली प्रथम मानव मिसिंग रजिस्टर चा तपास करत असताना सुजित वय २२, अभिजीत वय 18 ,या दोन्ही सख्या भावांना मोठ्या सीताफिने विचारणा केली असता धनंजय यांचे त्यांच्या नागपूर येथील सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या प्रेमिके च्याबाबत माहिती मिळाल्याने पत्नी व मुले यांच्यात वारंवार वाद होत असल्याने या मुलांनी विचार करून वडिलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे,
त्यांनी त्यांच्या वडिलांचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न दृश्यम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे केल्याचे उघड झाले आहे,सदर बाबतीमध्ये महाळुंगे पोलीस स्टेशन यांनी तात्काळ कारवाई करत सुमारे दोन तासातच सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दिसून आले आहे याबाबतीत पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पोलीस आयुक संजय माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक विवेक पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे विभाग किशोर पाटील पोलीस निरीक्षक विलास गोसावी राजू गणेश गायकवाड भाग्यश्री जमदाडे यांनी गुन्ह्यात उकल होण्यासाठी विशेष प्रयत्न केले चित्रपटातील दृश्यप्रमाणे झालेल्या या खुणाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या प्रकाराबाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे
सदर कुणाची चौकशी करून दोन तासात आरोपींना गुन्हा कबूल करून बेड्या ठोकण्यात आलेल्या पोलिसांच्या यशाबाबत सदर कामगिरीचं कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे दृश्यम चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेताची विल्हेवाट लावून चित्रपटातील हिंसक दृश्य ही मुलांवर विपरीत परिणाम करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे पुण्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग किशोर पाटील हे करत आहेत