युवती सेना व युवासेना च्या वतीने आरोग्य पर मार्गदर्शक व्याख्यान संपन्न….

टाकळीभान जिल्हा परिषद शाळा येथे युवती सेना व युवासेना च्या वतीने आरोग्य पर मार्गदर्शक व्याख्यान संपन्न….
टाकळीभान येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये युवती सेना व युवा सेना यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शकांच्या वतीने व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे , युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख नेहा लुंड, अंगणवाडी सेविका जिल्हाप्रमुख शारदा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर प्रियंका लांडे , डॉ. प्राजक्ता नागर, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. सोनी गौड आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रियंका लांडे म्हणाल्या की शालेय विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे, मुलांनी जागरूक राहून स्वतःची काळजी घ्यावी अनोळखी व्यक्ती पासून सावध रहावे,आपल्याला काही त्रास झाल्यास आपल्या आई-वडिलांना सांगावे असे त्या म्हणाल्या, डॉक्टर सुट्टी पाटील म्हणाल्या की मुलांनी अनोळखी व्यक्तीने चॉकलेट काही खाद्यपदार्थ दिल्यास खाऊ नये, काही आमिष दाखवल्यास बळी पडू नये असे त्या म्हणाल्या. तसेच डॉ. सोनी गौड यांनी मुलांना समोर बोलून प्रात्यक्षिक करून मुलांशी संवाद केला व आपले , परखे कसे ओळखावे याची माहिती दिली, तसेच डॉ प्राजक्ता नागर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्तम माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी डॉ. जिक्रा फारुकी, डॉ. शिफा शेख, डॉ. सोलिहा शेख, श्रीमती सोनाली आसने(लांडगे), बाळासाहेब दुधाळे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल कडू, शिक्षिका, संगीता उंडे, जया चव्हाण (दुधाळे), निशा भोसले ,सुनीता जाधव ,उज्वला पाचरणे आदी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार कानडे सर,यांनी केले तर शिवाजी पटारेसर, यांनी आभार मानले.