कृषीवार्ता

नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांचे शिव पाणंद शेतरस्त्यांचे परिपत्रक राज्याला दिशादर्शक- शरद पवळे 

नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांचे शिव पाणंद शेतरस्त्यांचे परिपत्रक राज्याला दिशादर्शक- शरद पवळे 

 

*तहसिलदारांचा सन्मान करत ऐतिहासिक निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत*

पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत मिळत असून जिल्हाभर प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात शेतरस्त्या संबंधात गांभीर्य निर्माण करत गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यांसाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटनाअन्नदात्याच्या पाठीशी उभे राहत आहे त्यातच नेवासा तालुक्यातील डाक बंगला शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राजव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले यावेळी नेवासा शिव पानंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर नेवासा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढत प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे तहसीलदार श्री संजय बिरादार, नायब तहसीलदार किशोर सानप, प्रशिक्षणार्थी तहसीलदार श्री विशाल यादव साहेब= परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार, श्री रवी सतवान साहेब परिविक्षाधीन तहसीलदार तथा निवासी नायब तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या वतीने श्री पवळे साहेब व नाथाभाऊ शिंदे यांनी निवेदन दिले यावेळी श्री विशाल यादव साहेब परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी व तहसीलदार व नायब तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या त्याचबरोबर प्रत्येक गुरुवार व शुक्रवार रोजी शेत रस्त्यांसाठी जनन्याय दिन सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी यावेळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अप्परतहसीलदार श्री विशाल यादव, श्री रवी सतवान परिविक्षाधीन तहसीलदार श्री चांगदेव बोरुडे निवासी नायब तहसीलदार श्री संदीप गोसावी उप अधीक्षक भूमि अभिलेख नेवासा यांनी महिन्यातून तीन शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे मोजणी करून देण्याचे आश्वासन दिले, श्रीमती अमिता सुरेश कासार मॅडम रोजगार हमी अव्वल कारकून यांनी परिपत्रक तयार करण्याचे विशेष सहकार्य केले.

 

तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदारांचा सत्कार करून सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, नाथाभाऊ शिंदे( सुरेगाव गंगा )श्री सागर सोनटक्के नेवासा बुद्रुक अजित भक्त रमेश भक्त संतोष शिंदे बबन शिंदे सोमनाथ उर्फ गणेश शिंदे,योगेंद्र बांद्रे, उंदीरगाव श्री त्र्यंबक भदगले तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना प्रशांत चौधऱी, श्री ज्ञानेश्वर जंगले पानेगाव, राजेंद्र गरड कुकाणा सुनील पाठक सोमा माकोणे अशोक नांदे पाचेगाव सगाजी ऐनर तामसवाडी,देवदान बनकर वाकडी, सुधाकर दौलतराव पवारआदी अडीचशे अडीचशे हुन शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धी अशा नावाच्या टोप्या डोक्यात परिधान केलेल्या होत्या व एक वेगळीच रॅली तयार केली होती ही रॅली चळवळीचे मुख्य आकर्षण निर्माण झाले होते

 महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने जनजागृती जनआंदोलन न्यायालयीन लढयाला बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या व्यथा समजून घेत प्रशासकीय पदाला योग्य न्याय देणाऱ्या नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार यांनी काढलेले परिपत्रक शेतकऱ्यांच मन जिंकणारे असुन नेवासा तहसील मधील शेत व शिवपानंद रस्त्याच्या शून्य पेंडिंग केसेस झाल्याशिवाय त्यांची बदली होऊ देणार नाही असे आशिर्वाद समस्त शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांनी देत इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांचा आदर्श घ्यावा – शरद पवळे ( महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)*

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे