वांगी खुर्द व वांगी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक धामधुम

श्रीरामपूर तालुक्यातील तालुक्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या ग्रामपंचायत म्हणजे वांगी खुर्द व वांगी बुद्रुक या ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीची पळापळ चालू झाली असून सध्याला उमेदवार चाचणी व फॉर्म भरणे चालू झाले आहे सत्ताधारी पार्टीला विरोधक घाम फोडण्याच्या तयारीत असून सत्ताधारी चांगलेच पद्धतीने मनस्ताप झालेला दिसत आहे. फॉर्म भरण्यासाठी अगोदर उमेदवार तयार करून गुडघ्याला बाशिंग बांधून तहसील कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर काहींचे फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रच नाहीत अशा पद्धतीने उमेदवार असल्याने पार्टीचालकांची चांगली तारांबळ उडाली आहे त्यानंतर ताबडतोब दुसरे कागदपत्र तयार असणारे उमेदवार तयार करणे हे जिकरीचे झाल्यामुळे राजकारण करण्यापेक्षा रानात शेळ्या मेंढ्या वळलेल्या बऱ्या असं सत्ताधारी व विरोधक यांच्या तोंडून ऐकायला मिळाले.
निवडणूक आल्यापुरतेच लोकांच्या दारात जाणाऱ्या राजकारण्यांना नागरिकांचा पडलेला दिसतोय विसर नागरिक मतपेटीतून देतील याचे उत्तर पाहूया पुढे.