राहुरीतील कारखान्यांनी संजीवनी कोळपेवाडी प्रमाणे भाव देऊन कार्यक्षेत्रातील ऊस तोडावा – सुरेशराव लांबे

राहुरीतील कारखान्यांनी संजीवनी कोळपेवाडी प्रमाणे भाव देऊन कार्यक्षेत्रातील ऊस तोडावा – सुरेशराव लांबे
गेल्या दोन वर्षांपासुन सतत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कांदा, सोयाबीन, कापुस व ईतर अनेक पिके उपळुण गेली. अशा परिस्थितीत शासनाकडुन कुठलीच मदत शेतकर्यांना मिळाली नाही. त्यातच कोरोना माहामारी मुळे झालेल्या लाॅकडाऊनच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यात शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय पार तोट्यात आला आहे. मात्र एकीकडे डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, पशुखाद्य यांचे दर वाढतच आहेत. या सर्व कारणांमुळे शेतकरी व सर्व सामान्य जनतेवर उपासमारीची व आत्महत्तेची वेळ आली आहे, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी व्यक्त केले.
अतिवृष्टीत भुसार पिकांचे नुकसान झाले. पण सर्व पाण्याची धरणे पुर्ण भरुन ओव्हरफ्लो झाल्याचा आनंद व या वातावरणातुन ऊसाचे पिक वाचल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गात काहीसे आनंदाचे वातावरण होते. पण राहुरी तालुक्यात दोन साखर कारखाने असताना देखील हे कारखानदार कार्यक्षेत्रातील ऊस अल्प प्रमाणात व बाहेरील ऊस मोठ्या प्रमाणात आणून तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय करत असुन ऊसाला तुरे आल्याने ऊसाची वाढ थांबलेली असुन वजन मोठ्या प्रमाणात घटत आहे. कार्यक्षेत्रात जे ऊस तुटत आहेत त्यामधे मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत आहे व ऊस तोडण्यासाठी काही अधिकारी व काही समाज कंटक दारु, मटण पार्टी घेऊन रोख रक्कम मागणीची सौदेबाजी शेतकऱ्याकडे होत आहे. त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे आडसाली ऊस आजही तसेच ऊभे आहेत.
विहीर बोअरवेलला पाणी आहे पण थकबाकीच्या नावाखाली महावितरण सक्तीची विज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा बंद करत आहे, त्यांच्याच सांगण्यावरूनच काही संघटना नाटकी आंदोलन करुन आम्ही पाच पाच हजार रुपये भरु असे शेतकऱ्यांच्या वतीने बोलत आहेत. पण प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांना एकही रुपया भरु देणार नाही, आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. धरण भरलेले असताना पाटपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे संपुर्ण रब्बी हंगाम संपत आला. तेव्हा पाणी सोडण्यात आले. पाटाला पाणी सोडले पण अनेक चा-यांना अजुनही पाणी सोडले जात नाही. गहु, कांदा, हरबरा हे पिक धरण भरलेले असताना अनेक शेतकऱ्यांना करता आले नाही. त्यासाठी यांना डिमांड पाहीजेत ज्यांच्यामुळे तुम्हाला डिमांड आले. त्यांनाच तुम्ही डिमांड मागत आहे. तुम्ही विसरलात, जलसंधारण विकासाच्या नावाखाली कोट्यावधीचा निधी मंजुर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापुन गवगवा चालु आहे. तो निधी कुठे व कसा खर्च केला, याची शहानिशा मा. ना. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील काळात करणार आहोत.
निसर्गाने केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची शासनाकडुन कुठलीच भरपाई मिळवुन दिली नाही. पण निसर्गाने भरलेल्या धरणातील पाण्याची किंमत शेतकऱ्यांनी मोजावी ही अपेक्षा काही व्यावसायिक पुढारी करत आहेत.
ज्यांनी निवडणुकीत बीडला पाणी जाऊ देणार नाही असे बोलले. त्यांनीच राहुरीतील शेतकऱ्यांचे पाणी बंद करुन पिके वाळवायचे काम केले. ज्यांनी निवडणुकीत आपल्याला मतदान केले त्यांचे ऊस तोडण्याऐवजी बाहेरील ऊस आणुन कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्तेची वेळ आणली आहे, असा आरोप सुरेशराव लांबे पाटील यांनी केला.
नगर जिल्ह्यातील सर्वच कारखानदार कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत भाव कमी देतात. व त्यातच नगर जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत राहुरी तालुक्यातील कारखाने 300 ते 450 रुपये भाव कमी देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुट करत आहेत.
काही बाहेरील कारखाने राहुरीतील ऊस नेऊन 2800 रुपये भाव देतात, मात्र यांना जवळ वाहतुक असुनही भाव देता येत नाही, या सर्व गोष्टींवर राहुरी तालुक्यातील व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व सर्व सामान्य नागरीक नक्कीच येणा-या काळात विचार करतील व प्रस्थापितांना तरुण पिढी उत्तर देईल, संजीवनी व कोळपेवाडी कारखान्याप्रमाणे 2500 ते 2555 प्रती टन पाहिले पेमेंट करुन कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस आणणे थांबुन कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर, लोकनायक नामदार बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार स्टाईलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मोर्चा आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.