दोन तालुक्याला जोडणाऱ्या कान्हेगाव पुलास नामदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नाने 12 कोटी रुपये मंजुंर-शरद नवले

दोन तालुक्याला जोडणाऱ्या कान्हेगाव पुलास नामदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नाने 12 कोटी रुपये मंजुंर-शरद नवले
दळण वळणाच्या दृष्टीने राहुरी व श्रीरामपुर या दोन तालुक्याला जोडणारा प्रवरा नदीवरील कान्हेगाव पुलाच्या बांधकामास राज्याचे महसुल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांनी बारा कोटी रुपये मंजुर केले असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले यांनी दिली आहे.
या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मा जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील केंदळ मानोरी टाकळीमीया जातप करजगाव मुसळवाडी दरडगाव खुडसरगाव पाथरे लाख त्रींबकपुर आदिसह पंधरा ते विस गावे व श्रीरामपुर तालुक्यातील लाडगाव कान्हेगाव पढेगाव वांगी उंबरगाव वळदगाव बेलापुर कारेगाव अशी श्रीरामपुर तालुक्यातील अनेक गावे जोडणारा प्रवरा नदीवर पुल असावा अशी दोन्ही तालुक्यातील नागरीकांची अनेक वर्षापासून मागणी होती प्रवरा नदीला पाणी असल्यास दोन्ही तालुक्यातील गावांचा संपर्क तुटत होता केवळ उन्हाळ्यात प्रवरा नदीला पाणी नसेल तरच प्रवरा काठावरील गावांचा संपर्क होत होताा
. दोन्ही तालुक्याला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे हा पुल होता त्यामुळे नागरीक प्रवरा नदीवर पुल व्हावा अशी वारवार मागणी करत होते दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन माझ्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे उपसभापती बाळासाहेब तोरणे रामभाऊ लिप्टे गीरीधर आसने महेश खरात मुकुंद लबडे अर्जुन खरात हनुमान खरात प्रविण लिप्टे आदिंनी नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी प्रवरा नदीवरील दोन तालुक्याच्या दृष्टीने दळणवळणा करीता महत्वाचा ठरणारा कान्हेगाव पुलास 12 कोटी रुपये इतका निधी मंजुर केला असुन या पुलामुळे अनेक गावे आपापसात जोडली जाणार असल्याचेही नवले यांनी सांगितले.