डायबिटीज आणि किडनी मोफत तपासणीचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा* *विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम* *१० हजार रुपये किंमतीच्या ३३ रक्त चाचण्या मोफत होणार*

*डायबिटीज आणि किडनी मोफत तपासणीचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा*
*विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम*
*१० हजार रुपये किंमतीच्या ३३ रक्त चाचण्या मोफत होणार*
ग्लोबल जीन कॉर्पोरेशन व शारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथे मोफत डायबिटीज व किडनी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे होणाऱ्या शिबीरामध्ये सुमारे १० हजार रुपये किंमतीच्या ३३ रक्त चाचण्या मोफत करून रुग्णांचे समुपदेशन करण्यात येणार आहे, शिबीराची नोंदणी सुरु झाली असून मोबाईल क्र.९४२३७१४८४७, ९४२०४२२२२४ व ७५८८६३५११२ येथे गरजू रुग्णांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डायबिटीज व किडनी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या रुग्णांना यापूर्वी मधुमेह किंवा मुत्रपिंडाचा आजार आहे अशा रुग्णांच्या हृदय, यकृत, मुत्रपिंड, थायरॉईड यांसह सुमारे ३३ प्रकारच्या रक्त व मुत्र चाचण्या या शिबीरामध्ये होणार आहेत. सर्व रक्त चाचण्या जागतिक दर्जाच्या पॅथॉलॉजीकल लॅबमध्ये करण्यात येणार आहेत. मधुमेहाचे शरीरातील इतर अवयवांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणारी ग्लोबल जीन कॉर्पोरेशन ही संस्था आणि शारदा प्रतिष्ठान, गेवराई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा शुभारंभ मंगळवार, दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असून कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते ॲड.सुभाष निकम, ग्लोबल जीन कॉर्पोरेशनचे समन्वयक डॉ.नंदकुमार पानसे, रणवीर अमरसिंह पंडित व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दि.२२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून दररोज मर्यादित रुग्णांची तपासणी होणार असल्यामुळे शिबीरपूर्व नोंदणी आवश्यक असून गरजू रुग्णांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. मोबाईल क्र.९४२३७१४८४७, ९४२०४२२२२४ व ७५८८६३५११२ या क्रमांकावर गरजू रुग्णांनी नोंदणी करावी असेही प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले आहे. ज्या रुग्णांना मधुमेह आणि मुत्रपिंडाचा आजार आहे त्यांनी शिबीरामध्ये सहभागी होताना आधार कार्ड, जुने रक्त तपासणी अहवाल व डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार या बाबतची माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. गर्भवती महिला आणि १८ वर्षांखालील मुलांची या शिबीरात तपासणी होणार नाही. सर्व सुविधा मोफत असल्यामुळे गरजू रुग्णांनी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.