रंगोत्सव सेलिब्रेशन चित्रकला आणि हस्तलेखन (मुंबई ) आयोजित स्पर्धेत सुजाता स्कुलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश..

रंगोत्सव सेलिब्रेशन चित्रकला आणि हस्तलेखन (मुंबई ) आयोजित स्पर्धेत सुजाता स्कुलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश..
सोनई चित्रकला हे कोणतीही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेण्यास मदत करते.जसे अंतर, आकार किंवा फरक.रेखांकन आपल्या मुलाला या संकल्पना शिकण्याची परिपूर्ण संधी देते.चित्रकलेमुळे वैयक्तिक आत्मविश्वास वाढतो, पालक म्हणून आज तुमच्या मुलाने काय नवीन केले आहे हे ऐकायला आपल्याला आवडते, मुलांना कल्पनाशक्ती आणि अनुभवांचे शारीरिक प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते म्हणूनच सुजाता इंटरनॅशनल स्कुल सोनई मध्ये आशा विविध स्पर्धेत मुलांना भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते त्यातच रंगोत्सव सेलिब्रेशन ऑर्गनायझेशन आयोजित रंगभरण व हस्तलेखन स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेत इयत्ता यु,. के. जी. ते १२वी पर्यंतचे एकूण २३९ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यानं ५० विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले त्यात मिसाळ आयुष् सुभाष या विद्यार्थ्याला नॅशनल सिल्वर अवॉर्ड मिळाला तसेच विद्यार्थ्यांना १८गोल्ड मेडल, १७ सिल्वर मेडल, १० ब्रॉंझ मेडल तसेच २ सरप्राईज गिफ्ट्स आणि २ विद्यार्थ्यांना के जी गिफ्ट विथ गोल्ड मेडल भेटले तसेच शाळेच्या प्राचार्या व कला शिक्षक याना देखील सन्मान चिन्ह ट्रॉफी व गिफ्ट्स मिळाले तसेच ४५ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली परितोषिकांचे स्वरूप रंगोत्सव सेलिब्रेशन ची ट्रॉफी,प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू असे होते.अशी माहिती शाळेच्या प्राचार्या ज्योती किरण सोनवणे मॅडम यांनी दिली तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना आज संस्थापक किरण सोनवणे सर यांच्या हस्ते पारितोषिक व भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक रोहित लहाड सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थापक किरण सोनवणे सर यांनी सर्व यशस्वीतांचे अभिनंदन केले .