धार्मिक

श्रीरामपूरकारांनी घेतले महान तपस्वी महेश्वरानंद गिरीजी महाराजांचे दर्शन.

श्रीरामपूरकारांनी घेतले महान तपस्वी महेश्वरानंद गिरीजी महाराजांचे दर्शन.

 

श्रीरामपूर : नवरात्रा आरंभी शहरातील संस्कृती व परंपरा जोपासण्याकरिता.जय श्रीराम प्रतिष्ठाणच्या वतीने, महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद गिरीजी महाराज ( हरियाणा ) यांची, शहरातील छ.शिवाजी महाराज रोड व मेन रोड मार्गे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेतील पारंपरिक ढोल ताश्यांची जुगलबंदी तसेच मर्दानी चित्त थरारक खेळांनी शहर वासीयांचे लक्ष वेधून घेतले.महान तपस्वी महाराज्यांच्या शोभा यात्रेचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा सरचिटणीस नितीन दिनकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे,महिला आघाडीच्या पूजा चव्हाण, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल,आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. जय श्रीराम प्रतिष्ठाणने काढलेल्या या पारंपरिक मिरवणुकीचे शहरातील नागरिकांसह, व्यापारी वर्गातुन कौतुक केले जात आहे. या भव्य मिरवणुकीस माजी नगरसेवक जितू छाजेड, डॉ शंकर मुठे, दत्ता जाधव,योगेश ओझा,सुबोध शेवतेकर,पंकज करमासे, बंडू शिंदे, विजय आखाडे,अतुल वढणे, पुष्पा हरदास,सपना थेटे,पौर्णिमा चव्हाण, प्रसाद बिल्दिकर, निलेश गीते, सुरेश सुवर्णपारखी, महेंद्र पटारे,गणेश भिसे,भोला साळवे, मोहन आडांगळे, रुद्र कुलकर्णी, किरण शिंदे,बाबासाहेब हरदास, तेजस काळे आदींसह शहरातील महिला,पुरुष, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

 

 नवरात्र उत्सवा दरम्यान महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद गिरीजी महाराज हे आपल्या छातीवर घटाची स्थापना करणार असून. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन दिनकर यांनी केलं आहे.

2/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे