गणेशोत्सवानिमित्त श्री साईपावन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत नेत्र तपासणी शिबीरास उत्तम प्रतिसाद.

गणेशोत्सवानिमित्त श्री साईपावन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत नेत्र तपासणी शिबीरास उत्तम प्रतिसाद.
गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक गणेश मित्र मंडळ श्री साई पावन प्रतिष्ठान श्री साई सेवा समीती तसेच ओम् दुर्गादेवी चँरीटेबल ट्रस्ट यांच्या सयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे उद्घाटन जि प सदस्य शरद नवले धार्मिक क्षेत्रात सतत अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कड उपसरपंच अभिषेक खंडागळे खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड श्री साई पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास चायल साईबाबा मंदिराचे माजी विश्वस्त सचिन गुजर श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रविण लुक्कड जेष्ठ नागरीक कनजी टाक आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करुन शिबीरास सुरुवात करण्यात आली या वेळी ओम् दुर्गादेवी ट्रस्ट मुंबई येथील डाँक्टर पी एम गर्ग डाँक्टर जितेंद्र राठोड सहाय्यक करण बादल संदीप निवडूंगे आदि उपस्थित होते या वेळी या शिबीराविषयी बोलताना श्री साई पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास चायल म्हणाले की गावातील अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी करीता माझ्याकडे आले होते त्या वेळी त्या कार्यकर्त्यासमोर अशी संकल्पना मांडली की तुम्ही करता ते कार्य चांगलेच आहे परंतु हे करताना आपण सामाजिक कार्य देखील करावे मी पुर्ण सहकार्य करण्यास तयार आहे त्या वेळी आपण नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीर घेवु त्या वेळी सर्व कार्यकर्त्यांना ही संकल्पना आवडली अन त्या संकल्पनेतुन या शिबीराचे आयोजन झाले तरुण पिढीला सामाजिक कार्याची आवड लागावी अशी अपेक्षा चायल यांनी या वेळी व्यक्त केली या शिबीरास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहील्याच दिवशी २७५ नागरीकांनी या शिबीराचा लाभ घेतला दोन दिवस चालणारे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रशांत बिहाणी, शशीकांत कापसे, रमेश पवार, सुभाष ताके, दत्तात्रय दाभाडे ,सुधीर करवा, संतोष ताथेड ,जनार्धन दाभाडे ,दिपक सिकची, शुभम कुमावत ,प्रथमेश नागले, दिपक जाधव, दर्शन भगत, जयेश उंडे, प्रसाद नागले, देवेंद्र उंडे ,ओंकार उंडे ,वैभव नागले ,आनंद चायल, योगीराज जाधव, गोपाल चायल, गौरव दायमा, अक्षय उंडे, अमीत बोरा, मयुर भगत, बंडू जाधव, प्रज्वल राकेचा, सुयोग गोरे, गोवींद चायल, गौरव जाधव, दुर्गेश राकेचा, रत्नेश कटारीया, यश कटारीया आदिंनी विशेष परिश्रम घेतले