नगर संभाजीनगर मार्गावर घोडेगाव शिवारात धावता ट्रक पेटला.

नगर संभाजीनगर मार्गावर घोडेगाव शिवारात धावता ट्रक पेटला.
जीवाची पर्वा न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी विजवला पेटता ट्रक जीवित हानी टळली.
15 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास अहमदनगर ते संभाजी नगर हायवे वर घोडेगाव नजिक मनिषा पेट्रोलियम जवळ धावत्या ट्रक ने सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने पंप चालकाची मोठी तारांबळ उडाली होती. सुदैवाने त्या ठिकाणी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे आपल्या सहकाऱ्या सोबत बंदोबस्ता दरम्यान पेट्रोलिंग करत होते.त्याच दरम्यान कांद्याने भरलेला ट्रक मनिषा पेट्रोलियम जवळ धावत्या ट्रक ने अचानक पेट घेतला होता. ट्रक चालक व इतरांना काही सुचेना.अशातच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी प्रसंगावधान राखत जिवाची पर्वा न करता पेटता ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन पेट्रोल पंपावरुन अग्निशमन शिलेंडरच्या सहाय्याने विझवली दरम्यान मुळा सहकारी साखर कारखान्याचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने पंप चालकाचा जिव भांड्यात पडला.सदरील ट्रक हा कांदा भरून रायपूर कडे निघाला होता.या कामी पो. काॅ. सुनील पालवे, पो. काॅ. ढोले यांनी सहकार्य केले.पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी वेळीच प्रसगअवधान राखत रस्त्यावरील व आजूबाजूला लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणून पुढील दुर्घटना टळली