मूकबधिर प्रवर्गातील दिव्यांगत्त्व निर्माण कशामुळे होते त्यामागील शास्त्रीय कारणे. 1.)गरोदरपणात निर्माण होणाऱ्या समस्या. 2.)प्रसुतीच्या वेळची कारणे.2) प्रसुती नंतरची कारणे याविषयावरती सविस्तर मार्गदर्शन

मूकबधिर प्रवर्गातील दिव्यांगत्त्व निर्माण कशामुळे होते त्यामागील शास्त्रीय कारणे. 1.)गरोदरपणात निर्माण होणाऱ्या समस्या. 2.)प्रसुतीच्या वेळची कारणे.2) प्रसुती नंतरची कारणे याविषयावरती सविस्तर मार्गदर्शन
टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर येथील मूकबधिर विद्यालयास कामगार हाॅस्पिटल सेवा निकेतन नर्सिंग स्कूल च्या ए.एन.एम.मधील विद्यार्थिनींची शैक्षणिक भेट.याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांनी मूकबधिर प्रवर्गातील दिव्यांगत्त्व निर्माण कशामुळे होते त्यामागील शास्त्रीय कारणे. 1.)गरोदरपणात निर्माण होणाऱ्या समस्या. 2.)प्रसुतीच्या वेळची कारणे.2) प्रसुती नंतरची कारणे याविषयावरती सविस्तर मार्गदर्शन केले.शैक्षणिक कार्यपद्धती व दिव्यांग व्यक्तीच्या विविध प्रकारच्या समस्या व सामाजिक उपक्रम यासंदर्भात माहिती देण्यात आली.
विद्यालयाचे वाचा उपचार तज्ञ मंगेश सालपे यांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरले जाणारे भाषा उच्चार शास्त्र यासंदर्भात माहिती दिली.यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी साईन लॅंग्वैजचे प्रात्यक्षिके सादर केली.ए.एन.एम.मधील द्वितीय वर्षात शिकत असणारी कु.पदमा हिने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर व विद्यार्थीनी चे स्वागत मुख्याध्यापक संतोष जोशी यांनी केले.याप्रसंगी कामगार हाॅस्पिटल च्या शिक्षिका सोनाली शिंदे व कोमल मोरे, मूकबधिर विद्यालयातील विशेष शिक्षिका कौशल्या जाधव, विशेष शिक्षक अतुल साळुंके यांची प्रमुख
उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.विद्यालयातील कलादालन संदर्भात कलाशिक्षक चंद्रकांत सांगळे व हस्तकला दालना संदर्भात कलाशिक्षक दिपक तरकासे यांनी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले तर आभार विशेष शिक्षक रामदास रासकर यांनी मानले.मूकबधिर विद्यार्थी व विद्यार्थीनींनी विविध प्रकारच्या हस्तकला वस्तू चे प्रात्यक्षिके सादर केली