आळंदीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी च्या सरचिटणीस पदी वर्णी*

*आळंदीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी च्या सरचिटणीस पदी वर्णी*
आळंदी देवाची येथील भूमिपुत्र माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली आहे.खेड तालुक्या चे लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचे विश्वासू समजले जाणारे प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे हे नगर परिषदेचे माजी नगरसेवक असून यांच्या कुटुंबात राजकीय वारसा असून सुमारे चार ते पाच दश त्यांचे कुटुंबातील आळंदी नगर परिषदेवर प्रतिनिधित्व करण्यात आले आहे.
समाजातील विविध घटकांबरोबर प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांचे निकटचे संबंध असून सामाजिक कार्य वसा वारसा ते पुढे नेत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील स्थानिक पातळीवर असणाऱ्या आळंदी पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटी वर ते सध्या कार्यरत आहेत. कुऱ्हाडे पाटील यांचे निवडीने आळंदीतील शिवस्मृती प्रतिष्ठान,विविध सार्वजनिक गणेश मंडळ तसेच स्थानिक प्रभागातील जेष्ठ वयोवृद्ध कार्यकर्त्यांनी त्यांचे समक्ष भेटून या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर. प्रदेश प्रतिनिधी डी डी भोसले पाटील.आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील. माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे पाटील, आळंदी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विलासराव घुंडरे पाटील. यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये खेड तालुक्यातील पी डी सी सी बँकेच्या कार्यालयात सदर निवडीचे पत्र देऊन श्री प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे सन्मानित करण्यात आले आहे.