राजकिय

खोटे प्रमाणपत्र जोडून बढती मिळवणारा ग्रामसेवक आदर्श कसा अर्चना रणनवरे.

खोटे प्रमाणपत्र जोडून बढती मिळवणारा ग्रामसेवक आदर्श कसा अर्चना रणनवरे.

 

 

खोटे प्रमाणपत्र जोडून बढती मिळवणारा ग्रामसेवक आदर्श कसा?व पक्ष प्रवेशासाठी दारोदार फिरणाऱ्याने नैराश्याची भाषा करू नये अशी प्रतिक्रिया – सरपंच.अर्चना रणनवरे.यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे

        टाकळीभान ग्रामपंचायत इमारत शेजारील ट्रॅक्टर शेड जागेबाबत ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी विद्यमान उपसरपंच यांच्या संगनमताने खोटा लिलाव केला. अनेकवेळा ह्या अनधिकृत लीलावाबाबत कागदपत्राची मागणी करून देखील कुठलेही ठोस पुरावे न दाखवता उडवाउडवीची उत्तरे ग्रामविकास अधिकारी यांनी दिली. ग्रामपंचायत सचिवालयाच्या खिडक्या सदर अनधिकृत बांधकामामुळे बंद होताना दिसत असताना डोळे झाक करून संगनमताने नोटीस बजावून खोटी पोहोच आम्हास दाखवतात.

       ग्रामविकास अधिकारी हे अनेकवेळा न केलेल्या कामाचे खोटे देयके पाठवतात. गावात जागेच्या व बांधकामाच्या परस्पर नोंदी करून पैसे घेतात. पाणी पुरवठ्याचे साहित्य परस्पर आणि विश्वासात न घेता खरेदी केल्या जातात. पाणी पुरवठ्याचे काम अनेकवेळा सांगून देखील डोळेझाक जाधव हे करतात. 

    माजी सरपंच रुपाली धुमाळ यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात जाधव यांच्याबद्दल गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या असून ग्रामसभेत अनेकवेळा ग्रामस्थांनी त्यांच्या बदली बाबत तक्रारी करून ठराव मांडलेला आहे. 

     महावितरणच्या कामाचे बिल देखील ग्रामपंचायत मार्फत काढण्याचा प्रयत्न ग्रामविकास अधिकारी हे बहुमताचा धाक दाखवून संगनमताने करतात. असा अधिकारी आदर्श कसा होऊ शकतो? आणि कोणी पक्ष प्रवेश देत नाही म्हणून दारोदार फिरणाऱ्याने संपूर्ण गाव बदली बाबत अनुकूल असताना देखील बदली होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या खोट्या सह्या गोळा करून स्वतःचेच राजकीय नैराश्य झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असा हल्लाबोल सरपंच अर्चना रणनवरे यांनी केला.

       तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या बदलीसाठी आज पंचायत समिती श्रीरामपूर येथे मुरकुटे – विखे गटांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी टाकळीभानच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच अर्चना रणनवरे यांनी केले

4.4/5 - (5 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे