धनंजय माने एक लढवय्या हरपला

धनंजय माने एक लढवय्या हरपला
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मध्ये माने पाटील परिवारामध्ये जन्माला आलेले धनंजय माने यांचे नुकतेच निधन झाले वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेऊन त्यांच्या आठवणी मागे ठेवल्या.
वांगी बुद्रुक मध्ये माने कुटुंब हे पूर्वीपासूनच मोठे शेतकरी असल्याने व परिसरामध्ये पाच भावांचा मोठा विस्तार त्यातच सर्वांनाच माणसं जोडण्याची आवड असल्याने त्यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी असायची धनंजय माने वडिलांना तीन मुलींच्या पाठीवर एकटे चिरंजीव असल्याने लाडामध्येच त्यांचे लहानपण गेले समजूतदार झाल्यावर त्यांना कुटुंबाचा वारसा असलेले समाजकारण असो राजकारण असो यामध्ये ते धडाडीने सर्वांच्या पुढे असायचे.
गावामध्ये कोणालाही कोणतीही अडचण असो वा कुणावर कोणताही अन्याय होत असेल तर लोक धनंजय माने यांच्याकडे धाव घेत असत समाजासाठी आपण काहीतरी देणे आहोत हे ध्यानात ठेवून ते कायम सामान्यांसाठी धडपडत असत.
संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचा वेगळा ठसा उमटण्यास ते यशस्वी झाले समाज हितासाठी त्यांनी वेगवेगळी कामे केली वांगी बुद्रुक मध्ये बिरोबा महाराज देवस्थान मंदिर सभामंड तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेच्या स्मारकासाठी त्यांनी समाजासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली.
सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येण्यासाठी ते कायमच धडपडत असत गावांमध्ये चांगल्या कामांना सर्वांना बरोबर घेऊन कामे करण्यात ते माहीर होते. धनंजय माने यांनी वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाल्याने गाव तालुका जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील मित्रपरिवार आप्तेष्ट यांना ते पोर्क करून निघून गेले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 6/ 9 /2023 रोजी वांगी बुद्रुक प्रवारातीरी होणार आहे
रुद्रा न्यूज