आरोग्य व शिक्षणसंपादकीय
अक्षय सरोदे याची By ju’s लर्निंग डेव्हलपरपदी नियुक्ती

अक्षय सरोदे याची By ju’s लर्निंग डेव्हलपरपदी नियुक्ती
तिळापुर-राहुरी तालुक्यातील तिळापुर मधील अक्षय सरोदे याची By ju’s कंपनीमध्ये लर्निंग डेव्हलपर म्हणून नियुक्ती झाली. अक्षयचे प्राथमिक शिक्षण तिळापुर मधील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण संगमेश्वर विद्यालय वांजुळपोई तर उच्च माध्यमिक शिक्षण आरबीएनबी कॉलेज श्रीरामपूर या ठिकाणी सायन्स मधून त्याने पूर्ण केले. त्यानंतर रायसोनी कॉलेज वाघोली येथून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. पुण्यातूनच निगडी या ठिकाणाहून एम सी एस पूर्ण करत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व लँग्वेज चे शिक्षण अक्षयने घेतले.
अक्षयचे वडील श्री नारायण सरोदे हे प्राथमिक शिक्षक असून जोगेश्वरी वस्तीवर अविरतपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत आहेत. अक्षयच्या या निवडीबद्दल परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.