अपघात

निशब्द; गोदाकाठचा कोहिनूर हिरा हरपला

निशब्द; गोदाकाठचा कोहिनूर हिरा हरपला

—————————————

गुलमेश्वरचे चेअरमन बापूराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

—————————————

गुळज येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

 

गेवराई तालुक्यातील गुळज येथील शिवसेनेचे युवा नेते तथा गुलमेश्वर गुळ कारखान्याचे चेअरमन पंचायत समिती सदस्य बापुराव बबनराव चव्हाण (वय वर्ष 42) यांचे शनिवार दि. 5 रोजी सकाळी 9 वाजता र्‍हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले असून गोठाकाठचा कोहिनूर हिरा हरपला आहे. तसेच या घटनेने सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी गुळज येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, ह.भ.प.रंगनाथ महाराज, ह.भ.प.संभाजी महाराज,माजी सभापती युध्दाजित पंडित,

युवा नेते रणवीर पंडित, बबनराव गवते, दिलीपराव गोरे, भाऊसाहेब नाटकर, बाळासाहेब मस्के, परमेश्वर वाघमोडे, शाहिनाथ परभणे, नवनाथ जाधव यांच्या सह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच नातेवाईक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गुलमेश्वर कारखान्याचे चेअरमन बापूराव चव्हाण यांना शनिवार दि. 5 रोजी सकाळी नऊ वाजता छातीत त्रास होत असल्याने तातडीने गेवराई च्या सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बीडला हलविण्यात आले. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. बापूराव चव्हाण यांनी अल्पावधीत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून लोकप्रियता मिळवली होती. सहकारी बॅंकीय संस्था, दोन गुळ कारखान्याची उभारणी करून गेवराई परिसरात उद्योग व्यवसायात विश्वासार्हता निर्माण केली होती. गोदापट्यात त्यांना मानणारा वर्ग निर्माण झाला होता. स्वभावाने शांत, संयमी असलेले बापूसाहेब चव्हाण, आबा नावाने सर्वत्र सुपरिचित होते.शनिवारी दि. 5 रोजी सायं. सात वाजता गुळज येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार आले.यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईक व ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चव्हाण परिवाराच्या दुःखात पत्रकार मित्र …..परिवार सहभागी आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे